आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'magnificent Mary' Takes To Ring In Women's Boxing's Olympic Debut ‎

LONDON OLYMPIC : मेरी कोमचे अभियान आजपासून सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - भारताची महिला बॉक्सर मेरी कोम रविवारपासून आपल्या ऑलिम्पिक अभियानाला सुरुवात करणार आहे. पाच वेळची विश्वविजेती मेरी कोमचा सलामीचा सामना पोलंडची कॅरोलिना मिशेलजुकविरुद्ध खेळवला जाणार आहे. जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या मेरी कोमला 51 किलो वजन गटात पदक मिळवण्यासाठी दोन लढती जिंकाव्या लागतील. विजयी सलामीनंतर तिला उपांत्यपूर्व फेरीत ट्युनिशियाच्या रहालीविरुद्ध खेळावे लागणार आहे. या सामन्यातील विजयाने उपांत्य फेरी गाठणा-या मेरी कोमला दुस-या मानांकित निकोलाच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.
ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्यासाठी तिने आपला वजन गट बदलला आहे. ‘सामन्यातील निकालाबाबत कोणत्याही प्रकारची भविष्यवाणी केली जाऊ शकत नाही. निकाल रिंगमधील कामगिरीवर अवलंबून असतो. काही जणांना वाटते की मला सोपा ड्रॉ मिळाला आहे. मात्र असे काहीही नाही. अतिउत्साहीपणे माझ्यासाठीचा ड्रॉ सोपा असल्याचे म्हणणे चुकीचे आहे,’ अशी प्रतिक्रिया मेरी कोमने दिली. दोन फे-या जिंकल्यानंतर माझे पदक निश्चित होणार आहे. मात्र मी या लढतीला आव्हानात्मक मानते. यातील चांगल्या कामगिरीवर मी लक्ष केंद्रित करणार आहे.
कठीण असणार सामना - प्रतिस्पर्ध्याविरुद्धचा सामना अधिकच कठीण असणार आहे. मी माझा वजन गट नुकताच बदलला आहे. ही माझ्यासाठी डोकेदुखी ठरू शकेल. मात्र मी कसून सराव करत आहे. पदक जिंकण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नसल्याचे मेरीने सांगितले.
मुलांना देणार बर्थडे गिफ्ट! - मेरी कोमसाठी ऑलिम्पिकमधील पहिली लढत खास असणार आहे. या लढतीच्या दिवशी तिच्यासाठी दुहेरी आनंदाचा योग जुळून येणार आहे. ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे, तर दुसरीकडे लढतीच्या दिवशी तिच्या जुळ्या मुलांचा वाढदिवस आहे. असा दुहेरी योगाचा आनंद तिला मिळणार आहे. जुळ्या मुलांचा वाढदिवस व लढत एकाच दिवशी असणे हा मेरी कोम अपूर्व योगायोग मानते. मुलांना विजयाचे वेगळे गिफ्ट देण्यासाठी ती प्रयत्न करेल.