आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भूपतीचे हताश उद्गारः शेवटची ऑलिम्पिक खेळलो, गुडबाय!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- लंडन ऑलिम्पिकमध्ये दुहेरीत दुस-याच फेरीत पराभूत झालेला भारताचा स्टार टेनिसपटू महेश भूपतीचे ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न अधुरेच ठरणार आहे. 2016 मध्ये रिओ द जानेरोमध्ये होणा-या ऑलिम्पिकमध्ये भूपती खेळणार नाही. दुहेरीतील पराभव भूपतीच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.
मंगळवारी रात्री रोहन बोपन्ना-महेश भूपती जोडीचा फ्रान्सच्या ज्युलियन बेनेतियू आणि रिचर्ड गास्के जोडीने 3-6, 4-6 ने पराभव झाला होता. सामन्यानंतर भूपती म्हणाला, पुढील ऑलिम्पिकमध्ये मी रोहनला चीअर-अप करेन, मात्र निश्चितच खेळणार नाही. ऑलिम्पिक पदक जिंकू न शकणे हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे शल्य राहील, मला ते स्वीकारावेच लागेल. मी आता नेहमीसाठी पदकविनाच राहील. आम्ही आमचे सर्वाेत्तम प्रयत्न केले होते. गेल्या चार ऑलिम्पिकपासूनच हाच प्रयत्न होता.
भूपती म्हणाला की, आम्ही पूर्ण तयारीनिशी लंडनमध्ये आलो होतो. जिंकण्याची दुर्दम्य इच्छा होती, मात्र तसे घडले नाही. पराभवाची जबाबदारी स्वीकारत भूपतीने सांगितले की, माझ्या किरकोळ खेळामुळेच पराभव झाला. या सामन्यातील पराभव पचवणे अवघड आहे. आमच्याकडे चांगली संधी होती. मजा मारायला आम्ही येथे आलो नव्हतो. माझ्या कामगिरीवर मीच खूप नाराज आहे. मी नेहमीच दबावात चांगली कामगिरी करत असतो, मात्र यावेळी असे घडले नाही. थोड्याफार झुंजीचे श्रेय रोहनला जाते. गेल्या दोन सामन्यांत त्याने चांगली कामगिरी केली, मी मात्र संघाला निराश केले.
भारतासाठी पदक जिंकण्याचे महत्त्व काय, याबद्दल भूपतीला प्रश्न विचारण्यात आला. यावर तो म्हणाला, देशाकडून खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे लहानपणापासून स्वप्न असते.