आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय खेळाडू शेवटून पहिले!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ऑलिम्पिकमधील मैदानी खेळात शुक्रवारी भारतीय खेळाडूंना ‘अपेक्षेप्रमाणे’ रिकाम्या हाताने परतावे लागले. ट्रॅक अँड फिल्डच्या पहिल्या दिवशी गोळाफेकपटू ओमप्रकाश करहाना आणि ट्रिपल जंपर मयुखा जानी अंतिम फेरीसाठी पात्र होऊ शकले नाहीत. जलतरणातील एकमेव खेळाडू गगन उलामठही निष्प्रभ ठरला.

जलतरणात गगन शेवटी
जलतरणात ऑलिम्किपमधील भारताचे एकमेव आव्हान गगन उलामठनेही निराशाच केली. 1500 मीटर फ्रीस्टाइल स्पर्धेत गगन शेवटच्या स्थानी राहिला. त्याने 16 मिनिटे 31.14 सेकंदांची वेळ नोंदवली. इतर स्पर्धकांपेक्षा एक मिनिट उशीर आणि एक लॅप त्याने घेतला. त्याच्या पराभवाने भारत जलतरणात इतर देशांपेक्षा कमी मागे आहे, हेच पुन्हा अधोरेखित झाले.
ओमप्रकाश शेवटून पहिला
पुरुष गटात भारताचा ओमप्रकाश करहानाने गोळाफेक स्पर्धेत 19.86 मीटर अंतरावर गोळा फेकला. पात्रता फेरीतील सर्व स्पर्धकांपैकी ओमप्रकाश शेवटच्या स्थानावर राहीला. चीन तैपेईच्या मिंग हुआंग चांगने 20.25 मीटर गोळाफेक केली. पात्रता फेरीत अमेरिकेच्या रिसे होफाने बाजी मारली. त्याने 21.36 मीटर लांब गोळाफेक केली.

मयुखा 22 व्या स्थानी
तिहेरी उडीत भारताच्या मयुखा जानीने निराशा केली. 13.77 मीटर लांब उडी मारत मयुखा 22 व्या स्थानी राहिली. या स्पर्धेत 12 स्थानावर राहिलेल्या स्लोव्हेनियाच्या मारिया सेस्ताकने 14.16 मीटरची उडी मारली. पहिल्या क्रमांकावरील कझाकस्तानच्या ओल्गा रिपाकोव्हाने 14.79 मीटर लांब उडी मारली.
PHOTOS : चला ऑलिम्पिक सफारीला...
PHOTOS: ऑलिम्पिक 2012 मधील आतापर्यंतचे गोल्‍ड मेडलिस्‍ट
भूपतीचे हताश उद्गारः शेवटची ऑलिम्पिक खेळलो, गुडबाय!
PHOTOS: ऑलिम्पिक खेळाडूंचे अनोखे टॅटू...पाहातच राहाल!
ऑलिम्पिक आणि वाद