आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Omprakash Mundada Businessman Of Nagpur Attained London Olympic For Encourges Of Indian Player

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

OLYMPIC: तिकिटासाठी काहीही करणारा अवलिया

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- ऑलिम्पिक दरम्‍यान प्रत्‍येक सामन्‍याच्‍यावेळेस एक व्‍यक्‍ती भारतीय झेंडयाचा शर्ट परिधान करून घोषणा देताना, पोस्‍टर दाखवत आणि भारतीय खेळाडूंचा उत्‍साह वाढवताना दिसतो. भारतीय सामन्‍याचे तिकिट मिळत नसतील तर तो बॅनर घेऊन रेल्‍वे स्‍टेशनसमोर उभारतो आणि तिकिटाची मागणी करतो. प्रत्‍येकाला त्‍या व्‍यक्‍तीबाबत उत्‍सुकता असते. त्‍यामुळे आम्‍ही त्‍यांच्‍याबद्दल जाणून घेण्‍याचा प्रयत्‍न केला. ही व्‍यक्‍ती चक्‍क आपल्‍या महाराष्‍ट्रातील आहे. आणि तेही नागपूरमधील. त्‍यांचे नाव आहे ओमप्रकाश मुंदडा. 50 वर्षाचे ओमप्रकाश हे उद्योजक आहेत.
खेळाचे चाहते असलेले ओमप्रकाश भारताच्‍या स्‍पर्धा जेथे-जेथे असतात त्‍या देशात जाऊन भारतीय खेळाडूंना प्रोत्‍साहन देतात. प्रत्‍येक ठिकाणी ते स्‍वखर्चाने जातात. अनेक आंतरराष्‍ट्रीय सामन्‍यात तर त्‍यांनी स्‍वयंसेवकाचीही भूमिका निभावली आहे.
ओमप्रकाश म्‍हणाले,' माझ्याकडे भारतीय सामन्‍याचे तिकिट नसल्‍यामुळे मी इथे बॅनर घेऊन उभा आहे. अनेक लोक मला मोफत तिकिट देतात. भारतीय खेळाडूंना प्रोत्‍साहन देण्‍यासाठी जाऊ इच्छितो. मात्र अनेक सामन्‍यांचे तिकिट मिळू शकत नाही. त्‍यासाठी मी रेल्‍वे स्‍टेशनबाहेर बॅनर घेऊन उभा राहतो. म्‍हणजे हे पाहून मला कोणीतरी तिकिट देईन.'
ऑलिम्पिकमध्‍ये सहभागी होण्‍याची ओमप्रकाश यांची ही सहावी वेळ आहे. त्‍यातील चार ऑलिम्पिकमध्‍ये त्‍यांनी स्‍वयंसेवकाची भूमिका निभावली आहे. त्‍यांनी लंडन ऑलिम्पिकमध्‍येही स्‍वयंसेवकासाठी अर्ज केला होता. मात्र तो मंजूर होऊ शकला नाही.
'मला प्रत्‍येक ऑलिम्पिकमध्‍ये जाण्‍याचा शौक आहे. याशिवाय मी तीन फिफा विश्‍वचषकातही भाग घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेतही स्‍वयंसेवकाची भूमिका निभावली होती. त्‍याशिवाय व्‍हँकूवर आणि टोरँटोच्‍या हिवाळी ऑलिम्पिकमध्‍येही सहभाग नोंदवला आहे. तसेच राष्‍ट्रकूल खेळात स्‍वंयसेवक म्‍हणून काम पाहिले आहे. क्रिकेट विश्‍वचषकातही हजेरी लावली आहे.' अशी माहिती त्‍यांनी यावेळी दिली.
ओमप्रकाश ज्‍याप्रमाणे खेळाडूंना प्रोत्‍साहन देतात, त्‍याप्रमाणेच त्‍यांना सल्‍लेही देतात. हॉकी सामन्‍यांच्‍यावेळी ते ओरडून-ओरडून खेळाडूंना सल्‍ले देत होते.
OLYMPIC GOLD : लंडनमध्ये झाला चमत्कार
OLYMPIC 10 वा दिवस: पॉवेलचा पराभव आणि जोकोव्हिचचे दुर्दैव
LONDON OLYMPIC : मायकेल फेल्प्सची कृतार्थ मनाने निवृत्ती
LONDON OLYMPIC : मायकल फेल्प्सची आई झाली भावुक
LONDON OLYMPIC : शेली ठरली वेगवान महिला
LONDON OLYMPIC : देशासाठी धावत नाही : रामसिंह
LONDON OLYMPIC : 101 वर्षांनंतर इंग्लंडला ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण