आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साईनाचा प्रशिक्षक असल्याचा अभिमान : पी. गोपीचंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन-साईनाचा प्रशिक्षक असल्याचा मला अभिमान वाटतो. भारतीय बॅडमिंटनसाठी ही मोठी घटना आहे. चीनविरुद्ध पदक मिळवणे ही गोष्ट असाध्य मानली जायची. साईनाने आज तीच गोष्ट साध्य केली आहे, अशी प्रतिक्रिया साईनाचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी व्यक्त केला.
साईनाची
कांस्यपदक ही सुरुवात आहे. हा प्रवास येथे थांबणार नाही. मी बीजिंगमध्ये साईना पराभूत झाल्यानंतरही म्हटले होते, पदक मिळाले नाही तरी साईनाचा प्रवास योग्य दिशेने सुरू आहे. आज साईनाने ते लंडन ऑलिम्पिकमध्ये सिद्ध करून दाखवले. पुढच्या ऑलिम्पिकची ही सुरुवात आहे. आतापासूनच पदकांच्या तयारीला सुरुवात करणार आहोत. भारतातील अधिकाधिक मुली या खेळाकडे जेव्हा वळतील तेव्हाच चीनसारख्या देशाला टक्कर देण्याचा फोर्स उभा राहील, असे ते म्हणाले.
...तरीही साईनाच जिंकली असती : पी. कश्यप
युवा स्टार पी. कश्यपने साईनाचे अभिनंदन केले आहे. साईनाने सुरुवात चांगली केली होती. पण चिनी खेळाडूने ‘ड्रॉप शॉट’ चांगले मारले. साईनाला पहिल्या गेमच्या शेवटी पुन्हा एकदा सूर गवसला होता. तिने चांगल्या रॅलीजही केल्या. परंतु चिनी खेळाडू त्या वेळी गेम जिंकण्यापासून एक गुणच दूर होती, असे तो म्हणाला. मला खात्री आहे. सामना पुढे सुरू राहिला असता तर सायना निश्चित जिंकली असती. कधी कधी दैवाची साथही आवश्यक असते. साईनाच्‍या आतापर्यंतच्या मेहनतीचे हे फळ आहे. साईनाच्‍या विजयामुळे भारतात अधिक मुली बॅडमिंटन खेळाकडे वळतील असा विश्वास वाटतो, असेही त्याने म्हटले.
OLYMPIC: चिनी खेळाडूंची दहशत कमी होईल - साईना
OLYMPIC सातवा दिवस: साईना \'शायनिंग\' तर जयवर \'भगवान\' नाराज !
खेळाडूंना माहिती असूनही घेतात उत्तेजक द्रव - साईना