आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लंडन- बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावणा-या बॉक्सर विजेंद्र सिंगकडून लंडन ऑलिम्पिकमध्ये मोठया आशा होत्या. मात्र क्वार्टर फायनलमधील त्याच्या अनपेक्षित पराभवानंतर त्या सर्व संपुष्टात आल्या आहेत.
उजेबेकिस्तानचा बॉक्सर अब्बोस अंताऐवविरूद्धच्या सामन्यात पहिल्या फेरीत विजेंद्र बरोबरीत होता. मात्र दुस-या फेरीत पारडे पालटले आणि अब्बोस विजेंद्रवर भारी पडला.
'अनेक वेळा चुका होतात. माझ्या पाठीतही दुखत होते. त्यामुळे मी थोडा मदांवलोही होतो.' असे पराभवानंतर बीबीसीशी बोलताना विजेंद्रने म्हटले. विशेष म्हणजे अब्बोस आणि विजेंद्र यापूर्वीही एकमेकांविरूद्ध खेळले आहेत.
विजेंद्रचे प्रशिक्षक गुरूबक्क्ष सिंग म्हणाले,' पहिल्या फेरीपर्यंत सामना बरोबरीत होता. दुस-या फेरीत विजेंद्र आघाडीवर आहे, असे वाटले होते. मात्र गुण प्रतिस्पर्धी खेळाडूला मिळाले. तिस-या फेरीतही असेच झाले. विजेंद्रने योजनेप्रमाणेच खेळ केला. परंतु, दुस-या-तिस-या फेरीत आम्ही जसा विचार केला होता तसे झाले नाही.'
निराशा
विजेंद्रने सामना हरल्यानंतर भारतीय कँपमध्ये नैराश्याचे वातावरण पसरले होते. त्याचा सामना पाहण्यासाठी आलेले अनेक अधिकारी निराश झाले. काही दिवसांपूर्वीच प्री-क्वार्टर फायनलमध्ये विजेंद्रच्या विजयानंतर घोषणा करणारे भारतीय समर्थक चूपचाप निघून गेले.
विजेंद्रच्या पराभवानंतर आता देवेंद्रो सिंगच्या रूपाने बॉक्सिंगमध्ये भारताचे एकच आव्हान टिकून आहे. आठ ऑगस्टला तो आपला क्वार्टर फायनल सामना खेळणार आहे.
OLYMPIC: विजेंद्रचा पराभव, सायनाचे मायदेशात जंगी स्वागत
LONDON OLYMPIC : ‘छुपा रुस्तम’ संबोधल्याने विजय नाराज
LONDON OLYMPIC : ‘डोपिंगचा डाग पुसला गेला’
OLYMPIC: लंडन ऑलिम्पिकमधील \'एम\' फॅक्टर
OLYMPIC: तिकिटासाठी काहीही करणारा अवलिया
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.