आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Special Interview Of Mary Kom After 1 St Winning Of Olympic

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

OLYMPIC: लंडन ऑलिम्पिकमधील 'एम' फॅक्‍टर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- एमसी मेरी कोम जेव्‍हा छोटी होती तेव्‍हा मुलांबरोबर जास्‍त खेळायची. अनेकवेळा त्‍यांची एकमेकांसोबत ठोसेबाजी होत असत. हा क्रम पुढे असा चालला की, मेरी कॉम कधी बॉक्सिंगच्‍या रिंगमध्‍ये आली हे तिलाच कधी कळले नाही. आज दोन मुलांची आई आणि पाचवेळा जागतिक विजेतेपद तिच्‍याकडे आहे. आता 'मम्‍मी' 'मेरी कोम' लंडन ऑलिम्पिकमध्‍ये 'मेडल' मिळवून देण्‍याची मोठी शक्‍यता आहे.
बीबीसीशी बोलताना मेरी कॉम म्‍हणते,' मी पदक जिंकण्‍यासाठी खूप आशावादी आहे. लंडनमध्‍ये पदक जिंकण्‍याची माझी शक्‍यता मोठी आहे. तेथे काहीही होऊ शकते. आणि मी त्‍यासाठी पूर्णपणे तयार आहे.'
लंडन ऑलिम्पिकमध्‍ये महिला बॉक्सिंगचा पहिल्‍यांदाच समावेश करण्‍यात आला आहे. सध्‍याची तिची कामगिरी पाहता, पदकाची ती मोठी दावेदार आहे.
ऑलिम्पिक हे एक स्‍वप्‍न
'ऑलिम्पिकमध्‍ये सुवर्ण पदक जिंकणे हे माझे मोठे स्‍वप्‍न आहे. मात्र यासाठी मी दबाव घेतलेला नाही. कारण यावर जास्‍त विचार केल्‍यास याचा परिणाम माझ्या सरावावर होईल.' असे तिने म्‍हटले.
ऑलिम्पिकमध्‍ये खेळायला मिळाले यातच मला खूप आनंद आहे. असेही ती यावेळी म्‍हणाली. ज्‍या गरीब परिवारातून आली आहे. ते पाहता येथेपर्यंत पोहोचणे ही खूप मोठी उपलब्‍धता आहे.
'माझ्या आई-वडीलांनी माझ्यासाठी खूप संघर्ष केला आहे. दोघांनी आपल्‍या मुलांना चांगले आयुष्‍य देण्‍यासाठी खूप मेहनत केली आहे. आमच्‍याकडे पैसे नव्‍हते. त्‍या दोघांनी कुठे-कुठे मजुरी केली, हे मी सांगू शकत नाही.'
मेरी कोम मुलगी असल्‍यामुळे तिने बॉक्सिंग खेळू नये असे तिच्‍या वडीलांना वाटायचे. उल्‍लेखनीय म्‍हणजे मेरी कोमने राज्‍य अजिंक्‍यपद मिळवले, तेव्‍हा आई-वडीलांना ती बॉक्सिंग खेळते हे माहित झाले.
गूपचूप बॉक्सिंग
मेरी कॉम म्‍हणाली,' मी बॉक्सिंग खेळण्‍यास सुरू केले तेव्‍हा घरच्‍यांना याची माहिती दिली नव्‍हती. जेव्‍हा मी राज्‍य अजिंक्‍पद पटकाविले. तेव्‍हा स्‍थानिक वृत्तपत्रात, रेडिओवर माझ्या बातम्‍या प्रसारीत करण्‍यात आल्‍या. तेव्‍हा वडीलांनी घरी बोलावून बॉक्सिंग खेळण्‍यास विरोध केला. या खेळात जायबंदी होण्‍याचा धोका असल्‍याचे त्‍यांचे म्‍हणणे होते.' शेवटी कुटुंबियांचे मन राजी करण्‍यास ती यशस्‍वी झाली.
पतीची प्रेरणा
मेरी कोमने लग्‍नानंतर बॉक्सिंगमध्‍ये खूप चांगले प्रदर्शन केले. याचे श्रेय ती आपले पती आणि मुलांना देते. माझ्या पतींनी माझ्या करीअरसाठी खूप मदत केली आहे. लग्‍नानंतर त्‍यांनी मला सांभाळले. ते स्‍वत: मेघालयकडून फुटबॉल खेळले आहेत.
OLYMPIC: तिकिटासाठी काहीही करणारा अवलिया
PHOTOS : चॅम्पियनला हरवून सरळ प्रमिकेकडे गेला मरे
PHOTOS : बोल्टने बनवला पुन्हा विश्व व्रिक्रम