आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Terror Will Slow Down In Badminton Of China's Player Says Saina

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

OLYMPIC: चिनी खेळाडूंची दहशत कमी होईल - सायना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- जागतिक बॅडमिंटन क्षेत्रात सध्या साईनाविरूद्धचायना असेच चित्र रंगवले जाते. त्यातही तथ्य नाही. मात्र, माझ्या कांस्यपदकामुळे चीनच्या स्पर्धकांची दहशत कमी व्हायला मदत होईल. या कांस्यपदकामुळे भारतीय बॅडमिंटनला नवा आत्मविश्वास मिळेल. चिनी स्पर्धक असतानाही पदके मिळू शकतात. विजेतेपद मिळू शकते, हा विश्वास निर्माण होईल, अशी प्रतिक्रिया कांस्यपदक जिंकल्यानंतर साईनानेव्यक्त केली.
असा विजय निश्चितच मला आवडणार नाही; परंतु त्यात माझा दोष नाही. मला विश्वास आहे की, दुसर्‍या गेममध्ये मी बाजी उलटवली असती, असे
साईनाम्हणाली.
भारताच्या खेळाडूंना बॅडमिंटनमध्ये पदक मिळू शकेल, असे आधी कुणालाही वाटत नव्हते. मात्र, आता तसे वाटणार नाही. खरे सांगायचे तर असे मलाही वाटत नव्हते. मात्र, आता चित्र बदलेल, असे
साईना म्हणाली.
वाँगने सामना सोडला तेव्हा..
गुडघ्याला होणार्‍या दुखापती ही बॅडमिंटनची नेहमीचीच समस्या आहे. सामना सुरू असताना वाँगला त्याच दुखापतीमुळे बाहेर व्हावे लागले. पहिल्या गेममध्ये ती गेमपॉइंटपासून एक गुण दूर असताना मी ओळीने चार गुण घेतले तेव्हा ती दमलेली वाटली. तिला त्या वेळी विश्रांती हवी होती, असे मला जाणवले. ती पाच मिनिटे
विश्रांतीघेत बसून राहिली त्यामुळे मीही विचलित झाले. ती अधिक वेळविश्रांतीघेत आहे हे पाहून मीही अस्वस्थ झाले होते, असे भारतीय खेळाडूने म्हटले.
PHOTOS: बाप रे बाप ! 8 दिवसांचा खेळ आणि 5 घोटाळे
PHOTOS: भेटा लंडन ऑलिम्पिकमधील सर्वात वयोवृद्ध खेळाडूला
PHOTOS: 'ऑलिम्पिक'मध्‍ये महिलांचे टॉपलेस आंदोलन