आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विजयकुमारने मिळवून दिले भारताला पहिले रॉप्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - सेनादलातील सुभेदार विजयकुमारने 25 मी. रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात रौप्यपदक जिंकून लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला दुसरे पदक मिळवून दिले. यापूर्वी गगन नारंगने 10 मीटर एअर रायफलमध्ये कांस्यपदक जिंकले होते. विजयने स्टेज-1, स्टेज-2 आणि फायनलमध्ये दमदार प्रदर्शन केले.

असे जिंकले रौप्य
स्टेज-1 मध्ये 293 गुणांसह चौथ्या स्थानी. स्टेज-2 मध्ये 292 गुणांसह चौथ्या स्थानी
फायनलमध्ये (आठ फे-या) : 5/4/4/3/4/4/2 असे एकूण 30 गुण. (40 पैकी)
क्युबाच्या पुपा ल्युरिसने 34 गुणांसह पटकावले सुवर्णपदक
चीनच्या डिंग फेंगने 27 गुणांच्या कमाईसह पटकावले कांस्यपदक

पदक देश, वडिलांना समर्पित
मी सैनिक आहे. शिस्त आणि जिद्द आमच्या रक्तात भिनलेली असते. हे पदक मी देशवासीयांना आणि माझ्या वडिलांना समर्पित करतो.- विजयकुमार

प्रत्येक वेळी साधला अचूक वेध
विजय लष्करातील 16 डोग्रा बटालियनचा सदस्य आणि सध्या सुभेदार या रँकवर मध्य प्रदेशातील महू येथे कार्यरत आहे.
2006 मेलबर्न राष्टÑकुलसाठी निवड, यात दोन सुवर्ण जिंकले.
2009 दोहा एशियन गेम्समध्ये एक सुवर्ण, एक कांस्य.
एशियन गेम्स (ग्वांग्झू 2010) मध्ये दोन कांस्य.

विजयकुमारने 25 मी. रॅपिड फायर पिस्तूलमध्ये जिंकले रौप्य
लंडन ऑलिम्पिकमधील दुसरे पदक, इतिहासात 22 वे पदक
एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत एकाच प्रकारात प्रथमच 2 पदके

चांदीच चांदी
03 किलो सोन्याचे मेडल सहाराकडून.
7 लाख रुपये क्रीडा मंत्रालयाकडून.
01 कोटी रुपये तामिळनाडू शासनाकडून.
30 लाख सॅमसंग, ओएनजीसी देणार.
6 लाख रुपये भारतीय लष्कराकडून.

इतरांकडून निराशा
बॅडमिंटन : सायनाचा उपांत्य फेरीत चिनी खेळाडूकडून पराभव. आता कांस्यसाठी खेळणार.
अ‍ॅथलेटिक्स : ओमप्रकाश, मयुखा हरले.
जलतरण : गगन हीटमध्ये अखेरच्या स्थानी.
नेमबाजी : जयदीप कर्माकर चौथ्या स्थानी.
हॉकी : जर्मनीकडून भारताचा पराभव.
ऑलिम्पिक बाहेर.

आज भारतासाठी खास

अ‍ॅथलेटिक्स : सुधासिंग (स्टिपलचेज), गुरमित, इरफान (चालण्याची शर्यत), कृष्णा पुनिया थाळीफेकीत खेळणार.
बॉक्सिंग : देवेंद्रोसिंग (49 किलो)चा मंगोलियाच्या सेरदांबाशी सामना. मनोजकुमार 64 किलो गटात इंग्लंडच्या थॉमसशी भिडणार.
नेमबाजी : शगुन चौधरी महिला ट्रॅपमध्ये खेळणार.
PHOTOS : चला ऑलिम्पिक सफारीला...
PHOTOS: ऑलिम्पिक 2012 मधील आतापर्यंतचे गोल्‍ड मेडलिस्‍ट
ऑलिम्पिक डायरीः आयोजकांची गोची
ऑलिम्पिक आणि वाद