आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘विजय’पथ! नेमबाजीत विजयकुमारने जिंकले रौप्यपदक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - सेनादलाचा शार्पशूटर विजयकुमारने शुक्रवारी लंडन ऑलिम्पिकमध्ये नवा इतिहास रचला. 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात त्याने जिगरबाज कामगिरी करताना रौप्यपदक जिंकले. कोणच्याही ध्यानीमनी नसताना विजयकुमारने गौरवशाली कामगिरी करत पदकासह देशवासीयांचे लक्ष वेधून घेतले. लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताचे हे दुसरे पदक ठरले. यापूर्वी 30 जुलै रोजी गगन नारंगने 10 मी. एअर रायफलमध्ये कांस्यपदक जिंकले होते. ऑलिम्पिकच्या इतिहासात नेमबाजीतील भारताचे हे चौथे पदक ठरले.
विजयकुमारची झुंज : विजयकुमारने फायनलमध्ये रशियाचा वर्ल्ड चॅम्पियन अ‍ॅलेक्सी किलीमोव, चीनचा डिंग फेंग, झांग जियान आणि जर्मनीच्या क्रिस्टियन रित्झ यांना मागे टाकून रौप्य आपल्या नावे केले. क्युबाच्या ल्युरिस पुपोने सुवर्णपदक जिंकले. चीनच्या फेंगने कांस्य मिळवले.
फायनलमध्ये 40 पैकी 30 शॉट अचूक लागले : 25 मी. रॅपिड फायर पिस्तूलची फायनल आठ फे-यांत झाली. प्रत्येक फेरीत पाच शॉट मारायचे होते. 26 वर्षीय विजयकुमारने फायनलमध्ये आठ फे-यांत 40 पैकी 30 शॉटवर अचूक नेम साधला. प्रत्येक फेरीत पाच शॉट मारायचे होते. क्युबाच्या खेळाडूने 40 पैकी 34 शॉट अचूक मारून रेकॉर्डसह सुवर्ण जिंकले.
विजयकुमारची दणक्यात सुरुवात : विजयकुमारने अतिशय अचूक नेम साधत दणक्यात सुरुवात केली. सुरुवातीच्या पाचही फे-यांत त्याने अचूक नेम साधत पूर्ण गुण घेतले. यानंतर त्याच्या कामगिरीत चढउतार झाले.
पुढच्या तीन फे-यांत पूर्ण गुण घेत तो पदकाच्या शर्यतीत आला. फायनलमध्ये किलिमोव (23), जियान (17) आणि क्रिस्टियन (13) हे तिघे मागे पडल्यानंतर विजयचे पदक जवळपास निश्चित झाले होते. पुपो, विजय आणि फेंग हे तिघेच पदकाच्या शर्यतीत राहिले.

ऑलिम्पिक नेमबाजीत चौथे पदक
1. राज्यवर्धन राठोड, रौप्यपदक, 2004 अथेन्स.
2. अभिनव बिंद्रा, सुवर्णपदक, 2008 बीजिंग.
3. गगन नारंग, कांस्यपदक, 2012 लंडन.
4. विजयकुमार, रौप्यपदक, 2012 लंडन.

सुभेदार विजयकुमारबाबत थोडेसे...
विजय सेनेतील 16 डोग्रा बटालियनचा सदस्य आणि सध्या सुभेदार या रँकवर मध्य प्रदेशातील महू येथे पदस्थ आहे.
सेनेत मिशन ऑलिम्पिक्स प्रोजेक्टनुसार ट्रेनिंग घेऊन ऑलिम्पिक मेडल जिंकणारा दुसरा नेमबाज आहे.
यापूर्वी कर्नल राज्यवर्धन राठोडने 2004 ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते.
विजयकुमारचे सेनाप्रमुख जनरल विक्रमसिंग यांनी पदक जिंकल्यानंतर अभिनंदन केले.
विजयला सेनेकडून 2007 मध्ये सेनादलाच्या मेडलने सन्मानित करण्यात आले होते.
16 वर्षांचा असताना 2001 मध्ये लष्करात भरती झाला.
दहावीपर्यंतचे शिक्षण किंडर गार्डन मॉडेल स्कूल हरसौर (हिमाचल प्रदेश) येथून घेतले.
सेनेच्या फैजाबाद ट्रेनिंग सेंटर येथे ट्रेनिंग.
2006 मेलबर्न राष्टÑकुलमध्ये दोन सुवर्ण जिंकले. 2009 दोहा एशियन गेम्समध्ये एक सुवर्ण, एक कांस्य.

फायनलमध्ये विजयची कामगिरी
40 पैकी 30 शॉट अचूक मारले.
क्वालिफिकेशनमधील कामगिरी
पहिल्या स्टेजमध्ये 293 आणि दुस-या स्टेजमध्ये 291 असे एकूण 285 गुण मिळवले.

येथे आलो तेव्हा मेडल वगैरे डोक्यात नव्हते. फक्त सर्वोत्तम कामगिरी करायची हे एकमेव ध्येय होते.
2007 मध्ये मी ज्या आर्मीत आहे, त्यांनी ‘मिशन ऑलिम्पिक’ ही योजना आखली. त्या योजनेला लागलेले हे फळ आहे.
या पदकासाठी सराव, सराव आणि सराव गेले दीड वर्ष करतोय. घरी गेलो नाही की घरच्यांचे तोंड पाहिले नाही.
OLYMPIC : भारताशी धोखा, विकासला विजयानंतरही पराभूत घोषित केले
पदक देशाला, वडिलांना अर्पण: विजयकुमार
सायनाची अपयशी झुंज : सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले; आता लढत कांस्यपदकासाठी
विजेंद्रची उपांत्यपूर्व फेरीत धडक
OLYMPIC: विजेंद्र सिंगचा विजय, सुपर सायना उपांत्‍यफेरीत धडक
OLYMPIC: सुपर सायना उप-उपांत्‍यपूर्व फेरीत, ज्‍वाला-अश्विनी जोडीचाही विजय
PHOTOS: रंगात आला गगन नारंग !
LONDON OLYMPIC : गगन नारंगवर सेलिब्रेटींचा शुभेच्‍छांचा वर्षाव