आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विजेंद्रची उपांत्यपूर्व फेरीत धडक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - भारताचा स्टार बॉक्सर विजेंद्रसिंगने मिडलवेट (75 किलो) गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पदकाचा प्रबळ दावेदार असलेल्या विजेंद्रने गुरुवारी रात्री अतिशय जवळच्या लढतीत अमेरिकेच्या टेरेल गॉशाला एका गुणाच्या फरकाने 16-15 ने पराभूत केले. आता उपांत्यपूर्व फेरीत विजेंद्रचा सामना उझबेकिस्तानच्या अब्बोस अतोएवशी होईल. उझबेकिस्तानच्या खेळाडूने प्री-क्वार्टर फायनलमध्ये रशियाच्या रोगदान जुरातोनीला 12-10 ने मात दिली. उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा विजेंद्र पहिला बॉक्सर ठरला आहे.

पहिल्या फेरीत विजेंद्रची आघाडी : चारही बाजूंनी इंडिया...इंडिया...ची नारेबाजी सुरू असताना विजेंद्रने पहिल्या राउंडमध्ये दे दणादण पंच मारताना 4-3 ने आघाडी घेतली होती.
दुसरी फेरी 5-5 ने बरोबरीत : दुस-या फेरीत विजेंद्र आणि गॉशा यांच्यात झुंज रंगली. दोघांनी प्रत्येकी 5 गुण मिळवले.
तिसरी फेरी बरोबरीत : तिस-या फेरीत विजेंद्र आणि गॉशा या दोघांनी आक्रमक रणनीती स्वीकारली. तिसरी फेरीसुद्धा 7-7 ने बरोबरीत सुटली. मात्र पहिल्या फेरीच्या एका गुणाच्या आघाडीवर विजेंद्रने सामन्यात विजय मिळवला.
OLYMPIC दिवस दुसराः सायना, विजेंद्र, जयभगवान जिंकले !
यंदा पदकाचा रंग बदलणार : विजेंद्र
ऑलिम्पिकनंतर देशात बॉक्सिंगचे चित्र बदलेल : विजेंद्र