आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

OLYMPIC: विकास गौडाकडून निराशा, मेरी कोमची आज अग्निपरीक्षा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडनः भारताची अव्‍वल महिला धावपटू टिंटू लुका 800 मीटर शर्यतीच्‍या सेमीफायनलमध्‍ये पोहोचली आहे. सेमीफायनल उद्या होणार आहे. टिंटू लुका ही भारताची माजी धावपटू पी. टी. उषा हिची शिष्‍या आहे. तिने पात्रता फेरीत 02.01.75 अशी वेळ नों‍दविली. या फेरीत ती तिसरी आली. सेमीफायनलमध्‍ये तिच्‍याकडून पदकाची अपेक्षा व्‍यक्त करण्‍यात येत आहे. या शर्यतीत जमैकाची धावपटू व्‍हेरोनिका कॅम्‍पबेल ही सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. यापुर्वी तिने लागोपाठ दोन ऑलिम्पिक सुवर्णपदक प्राप्‍त केले आहेत. ती हॅट्ट्रिक पूर्ण करण्‍याच्‍या इराद्याने धावेल. हे लक्ष्‍य तिने साध्‍य केले तर असा विक्रम नोंदविणारी ती पहिलीच महिला धावपटू ठरेल. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकाची वादग्रस्‍त धावपटू कास्‍टर सेमेन्‍या हीदेखील सेमीफायनलमध्‍ये पोहोचली आहे.

विकास गौडा अपयशी
लंडन ऑलिम्पिकमध्‍ये आणखी एका पदकाचे स्‍वप्‍न भंगले आहे. थाळीफेकीमध्‍ये विकास गौडा अपयशी ठरला. थाळीफेकीच्‍या फायनलमध्‍ये विकास गौडा आठव्‍या क्रमांकावर राहीला. विकास गौडाने पहिल्‍या प्रयत्‍नात 64.79 मीटर लांब फेक केली होती. हा त्‍याचा सर्वोत्तम प्रयत्‍न होता. जर्मनीच्‍या रॉबर्ट हार्टिंगने 68.27 मीटर लांब थाळी फेकून सुवर्ण पदक जिंकले. थाळीफेकीमध्‍ये महिला गटातही भारताच्‍या पदरी निराशा हाती आली. कृष्‍णा पुनिया हिलाही पदक जिंकण्‍यात अपयश आले. ती सातव्‍या क्रमांकावर राहीली. परंतु, दोघांनी थाळीफेकीच्‍या प्रकारात फायनमध्‍ये प्रवेश मिळविला. हीदेखील भारताच्‍या दृष्‍टीने मोठे यशच आहे. ऍथलेटीक्‍समध्‍ये आतापर्यंत केवळ 7 जण कोणत्‍याही क्रिडा प्रकारात फायनल गाठू शकले आहेत. त्‍यापैकी विकास आणि कृष्‍णा यांनी यावेळी फायनल गाठला.

मेरी कोमची अग्निपरिक्षा
भारताच्‍या मेरी कोमची आज अग्निपरिक्षा आहे. तिने कांस्‍य पदक तर निश्चित केले आहे. मात्र, आज उपांत्‍य फेरीची लढत जिंकून तिला किमान सुवर्णपदक निश्चित करता येईल. त्‍यासाठी तिला ब्रिटनच्‍या निकोला ऍडम्‍सचे कडवे आव्‍हान राहणार आहे. वर्ल्‍ड चॅम्पियनशिपमध्‍ये निकोलाने मेरी कोमचा पराभव केला होता. त्‍यामुळे मेरी कोमने प्रचंड परिश्रम घेतली होती. या परिश्रमाचे फळ तिला मिळते का, याचा निकाल आज सायंकाळी लागणार आहे.
OLYMPIC: ... जेव्‍हा \'बिग बी\' ही करतात चूक
OLYMPIC : कसे देतात बॉक्सिंगमध्ये गुण
OLYMPIC मसाला: क्रीडाप्रेमीचा शेवट मैदानातच
LONDON OLYMPIC : भारताच्या फुल‘राणी’ला रथाची स्वारी!
LONDON OLYMPIC : अभिनव बिंद्रा व विजेंद्र अपयशी, सुशीलकडून आशा
LONDON OLYMPIC : येलेनाच्या साम्राज्याला सुरूंग