आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुदिरमन कप बॅडमिंटन स्पर्धेत भारताची कसोटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एकेकाळी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेला जे महत्त्व होते तेवढीच प्रतिष्ठा असलेल्या सुदिरमन कप बॅडमिंटन स्पर्धेला रविवारपासून प्रारंभ हाेत आहे. ही स्पर्धा डॉन गुआन (चीन) येथे १० ते १७ मे या कालावधीत होणार आहे. जगातील सर्वोत्तम बॅडमिंटनपटूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंचा ख-या अर्थाने कस लागणार आहे. २०१५ च्या स्पर्धेत जगातील ३५ देशांचे अव्वल खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत आहेत.
एकूण ४ गटांमध्ये संघाची विभागणी करण्यात आली असून ग्रुप १ मधील १२ अव्वल संघांची आणखी उपगटात विभागणी करण्यात आली आहे.
भारताचा समावेश ‘१ ड’ गटात असून सोबत कोरिया आणि मलेशियाचे आव्हान आहे. दोन स्तरांवर होणा-या या स्पर्धेत प्रत्येक गटातील दोन संघांना पुढे जाता येईल. पुरुष व महिला एकेरी तसेच पुरुष व महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा एकूण पाच प्रकारांसाठी स्पर्धा होईल.

तीन देशांचे वर्चस्व कायम
इंडोनेशियाचे माजी बॅडमिंटन स्टार डिक सुदिरमन यांच्या नावाने या स्पर्धेला १९८९ पासून सुरूवात झाली. अल्पवाधीत ही स्पर्धा लाेकप्रिय ठरली. बॅडमिंटनमधील जागतिक वर्चस्व सिद्ध करणारी ही स्पर्धा दर दोन वर्षांनी अायाेजित करण्यात येते. मात्र, आतापर्यंत चीन, कोरिया आणि इंडोनेशिया याच देशांना ही स्पर्धा जिंकता आली आहे. त्यांनी वर्चस्व राखले अाहे.

यंदा भारतीय दावा
भारतीय संघ या स्पर्धेच्या विजेतेपदाच्या जवळपास पोहोचला आहे. त्यामुळे महिला एकेरीत अव्वल सायना नेहवाल, श्रीकांत सिंधू , पी. कश्यप हे सज्ज अाहेत. यामुळे स्पर्धा जिंकणारा चौथा देश म्हणून भारताचे नाव स्पर्धेच्या इतिहासात नोंदवले जाऊ शकते. स्टार स्पोर्ट््स २ या
वाहिनीवर सकाळी १०.३० ते ३.३० या भारतीय वेळेनुसार स्पर्धेचे थेट प्रक्षेपण होईल. भारत-मलेशिया सामना ११ मे रोजी (४.३० ते ९.३० रात्री) होईल. १३ मे रोजी भारत-कोरिया लढत सकाळी १०.३० वाजता सुरू होईल.