आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लंडन- ज्या खेळाडूंचे क्रीडा प्रकार हे हॉलमध्ये आहेत, त्यांना लंडनमधील हवामानाचा आणि वा-याचा त्रास होणार नाही. मात्र, जे क्रीडा प्रकार मैदानात आहेत, त्यामध्ये खेळाडूंना या हवामानाचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या प्रकारांपैकी भारताच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचा आणि ज्या प्रकारातून भारताला पदकाची अपेक्षा असलेला क्रीडा प्रकार म्हणजे डबल ट्रॅप. या क्रीडा प्रकारात भारताला रंजनसिंग सोढी यांच्याकडून पदकाची आस लागलेली आहे. हवामानाच्या धोक्यासंदर्भात बोलताना त्यांनी सांगितले, की फटका बसू शकतो, हे मान्य; पण तो कुणालाही बसू शकतो. म्हणजेच केवळ आपल्याच देशातील खेळाडूंना नव्हे, तर या प्रकारात सहभागी होणा-या प्रत्येक खेळाडूला तो धोका लक्षात ठेवूनच खेळ करावा लागणार आहे. विशेषत: डबल ट्रॅप प्रकारात त्याचा फटका बसू शकतो, मात्र तीच परिस्थिती सर्वांसाठी राहणार असल्याने त्याबाबत फार फिकीर करण्याची गरज मला वाटत नसल्याचे त्यांनी नमूद केले. कोणाही नेमबाजाला हे डोक्यात ठेवूनच तयारी करावी लागणार आहे.
मी या क्रीडा प्रकारात प्रदीर्घ काळापासून आहे. त्यामुळे कोणत्या हवामानात मी कसे खेळायचे याबाबत मला पूर्ण माहिती आहे. या स्पर्धेत 150 पैकी 145 गुण मिळाले तरी पदक शक्य असल्याचे सोढी यांनी नमूद केले. यंदा झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सोढी यांना सातवे स्थान मिळाले होते. या स्पर्धेत सुवर्णपदकावर सर्वाधिक दावेदारी कुणाची राहील, असा प्रश्न तुम्ही विचारताय म्हणून सांगतो की, सध्याच्या अमेरिकेचा वर्ल्ड नं. 1 मानांकन असलेला पीटर विल्सन याचा दावा मजबूत राहणार आहे. मात्र, या सर्व बाबी मैदानात उतरेपर्यंतच ख-या असतात. जो कुणी त्या दिवशी सर्वोत्तम कामगिरी करेल तोच जिंकतो, असेही सोढी यांनी नमूद केले.
नशिबाची साथ आवश्यक
तुम्ही आजपर्यंतचे सर्वोत्तम नेमबाज असलात तरी प्रत्यक्ष सामन्याच्या दिवशी तुमच्या नशिबाने तुम्हाला अल्पशी का होईना साथ देणे आवश्यक असते, असे मला वाटते. तसेच मला या हवामानाची पूर्ण माहिती असल्याने मी निश्चिंत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.