आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लंडन- ऑलिम्पिकमध्ये उजबेकिस्तानचा वेटलिप्टर शेर्जोदुजोन युसपोव्ह लोकांचे आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यास कमालीचा यशस्वी ठरला. त्याने आपल्या कामगिरीने लक्ष वेधले नाही तर वजन उचलताना ओरडण्याने लोकांना आकर्षित केले.
त्याच्या ओरडण्याने लोक शेवटपर्यंत तिथे थांबले. तो जेव्हा पुन्हा वजन उचलायला यायचा तेव्हा लोकही त्याच्याबरोबर तसेच ओरडायचे. त्यामुळे त्याचा आणखी उत्साह वाढायचा. लढत जिंकण्यात जरी त्याला अपयश आले तरी त्याने स्पर्धेनंतर लोकांना अभिवादन केले. आणि भावूक होऊन इथल्या लोकांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. लोकांनी आपल्याबरोबर 'येह-येह' म्हणून जो प्रतिसाद दिला त्यामुळे मी भारावलो, असे त्याने म्हटले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.