आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेटलिफ्टर मीनाक्षी राणीवर गरिबीमुळे उपासमारीची वेळ!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- राष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकणार्‍या एका वेटलिफ्टरवर सध्या गरिबीमुळे अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. मीनाक्षी राणी असे तिचे नाव आहे. दारिद्रय़ाला वैतागलेल्या राणीने नोकरी द्या अशी मागणी करत रविवारी उत्तर प्रदेश विधानभवनासमोर निदर्शने केली. 10 दिवसांत नोकरी मिळाली नाही तर आपल्या दोन मुलांसह विधानभवनासमोर आत्महत्या करण्याचा इशाराही तिने दिला आहे.

ज्युनियर आशियाई स्पर्धा तसेच सीनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये (1999) कांस्यपदक, 1995 मध्ये राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक, 1996 साली सुवर्णपदक आणि 1998 साली रौप्यपदक जिंकण्याचा पराक्रम राणीच्या नावे आहे. 2011 साली झालेल्या अपघाताने तिच्या आयुष्यात अचानक वादळ आले. या अपघातात राणीच्या पतीचा दुर्दैवी मृत्यू झाला. खुद्द राणीच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे तिला नोकरी गमवावी लागली. राज्य सरकारकडून तिला सरकारी नोकरीचे आश्वासन मिळाले होते.

शासनाने केला विश्वासघात
सरकारने विश्वासघात केला आहे. त्यामुळेच विधानभवनासमोर निदर्शने करावी लागली. दहा दिवसांत सरकारने नोकरीवर घेतले नाही तर दोन मुलांसह विधानभवनासमोरच जीवन संपवून टाकेन.
- मीनाक्षी राणी, माजी वेटलिफ्टर