आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

100 मीटर सुवर्ण पदकाचा दावेदार म्‍हणतो, 'केवळ पदकासाठीच'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- प्रत्येक ऑलिम्पिकमधील सर्वात महत्त्वाचे आकर्षण असते, ते म्हणजे जगातील वेगवान मानव कोण ? त्याचा अंतिम निर्णय देणारी 100 मीटर धावण्याची स्पर्धा. प्रत्येक क्रीडाप्रमीचे या स्पर्धेकडे आणि त्यातही प्रत्येक वेळी घडून येणार्‍या नवीन विश्वविक्रमाकडे. मात्र, येत्या रविवारी होणार्‍या स्पर्धेमधील एक प्रमुख दावेदार असलेल्या योहान ब्लॅकने आपण या स्पर्धेत विश्वविक्रम करण्यासाठी नव्हे, तर सुवर्णपदक जिंकण्यासाठीच धावणार असल्याचे सांगितले.
लंडन ऑलिम्पिकमध्येदेखील स्पर्धेच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू 100 मीटरची स्पर्धाच असून त्यात उसैन बोल्ट या मागील विश्वविजेत्याला योहान ब्लॅक, टायसन गे, जस्टीन गॅटलीन आणि असाफा पॉवेल या पाच धावपटूंचे आव्हान राहणार आहे. त्या आव्हानवीरांपैकी सर्वात प्रमुख आणि नुकत्याच दोन स्पर्धांमध्ये बोल्टला पिछाडीवर टाकणार्‍या योहान ब्लॅकला जेव्हा विचारण्यात आले की, या स्पर्धेमध्ये नवीन विश्वविक्रम घडतील असे तुम्हाला वाटते का? त्यावर बोलताना ब्लॅक म्हणाला की, जेव्हा जगातील सर्वाधिक वेगवान धावपटू एकाच वेळी मैदानावर उतरतील त्या वेळी धावपटूंमधील स्पर्धेमुळे वेगाची परिसीमा गाठली जाणे हा त्या खेळाचाच भाग आहे. लोकांना प्रत्येक वेळी नवनवीन रेकॉर्ड बनलेले बघायला आणि रेकॉर्ड तोडताना बघायला आवडते. जेव्हा एकाहून एक सरस धावपटू मैदानात असतात, त्या वेळी विश्वविक्रम किंवा तत्सम काही तरी वेगवान घडणारच आहे; परंतु आम्ही सर्वजण वेळेच्या विक्रमासाठी नव्हे, तर सुवर्णपदकासाठीच धावणार आहोत. प्रत्येकाने शर्यतीत सहभागी होण्यासाठी आणि ती जिंकण्यासाठी तब्बल चार वर्षे अथक मेहनत आणि प्रतीक्षा केलेली असते. त्यामुळे यंदाची शर्यतदेखील जनतेची अपेक्षापूर्ती करेल, असे मला वाटते.
स्काय इज द लिमिट' हेच माझे तत्त्व
या स्पर्धेचे दडपण प्रत्येक धावपटूवर असते, तसेच माझ्यावरही आहे. मात्र, मी युसेनवर किंवा अन्य कोणावरही लक्ष केंद्रित केलेले नाही. मी शर्यतीवर लक्ष केंद्रित केलेले आहे. कारण 'स्काय इज द लिमिट' हेच माझे तत्त्व आहे.
क्रिकेट बघून टाइमपास
मी केवळ मैदानावरच स्पर्धेचा विचार करतो. तिथून बाहेर आल्यावर मी मनानेदेखील ट्रॅकच्या बाहेर येतो. सध्या मी लंडनमध्ये क्रिकेट मॅच पाहून टाइमपास करतो आहे. असा रिलीफदेखील मनाला ताजेतवाने करण्यासाठी पुरेसा असतो.
लंडन रेस कारकिर्दीतील सर्वात मोठे आव्‍हानः उसेन बोल्‍ट