आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • olympic update on august one, Kashyap Reach In Quatar Final

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्वार्टरफायनलमध्ये पोहचला पी. कश्चप, आठ महिला खेळाडूंवर फिक्सिंगचे आरोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - लंडन ऑलिंपिकमध्ये फिक्सिंगचे प्रकरण पुढे आले आहे. महिला बॅडमिंटन संघाच्या खेळाडूंनी जाणून-बुझून मॅच हारण्याचा प्रयत्न केला. जेणेकरुन, पुढच्या फेरीत कुमकुवत संघाबरोबर आपल्या संघाचा सामना होईल. याबाबत बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने कडक कारवाई करताना फिक्सिंगमध्ये सामील झाल्याच्या आरोपावरुन आठ महिला खेळाडूंना लंडन ऑलिंपिकमधून बाहेर काढले आहे. दक्षिण तैफई (चीन) खेळाडू जपान संघाच्या विरोधात मुद्दाम हारल्याबाबत भारताने बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने तक्रार केली होती.
त्यानंतर भारताच्या तक्रारीची दखल घेत चौकशी सुरु केली. या चौकशीत दोन्ही संघ जबाबदार असल्याचे ठरवित बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने ऑलिंपिकमध्ये भाग घेतलेल्या आठ महिला खेळाडूंवर 'मॅच जिंकण्यासाठी आपले पुरेश कौशल्य पणाला लावत नाहीत' असा आरोप ठेवत ८ महिला खेळाडूंना ऑलिंपिकमधून निलंबित करीत असल्याचे जाहीर केले. या खेळाडू बॅडमिंटनमधील दुहेरी प्रकारात भाग घेतला होता. यात दोन दक्षिण कोरियाची, एक चीनी आणि एक इंडोनिशियाच्या टीममधील खेळाडूंचा समावेश आहे. यात चीनच्या यू यांग आणि वांग शिलाओली, दक्षिण कोरियाच्या जंग क्यूंग-यन आणि किम हा ना या खेळाडूंचा समावेश आहे.
असोसिएशनचे म्हटले होते की, या खेळाडूंची चौकशी करण्यात येत आहे. जर त्या दोषी सापडल्या व आरोप सिद्ध झाले, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. त्यांची चौकशी केल्यानंतर भारतीय संघाच्या तक्रारीत तथ्य असल्याचे दिसून आले. त्यानुसार त्यांना यंदाच्या लंडन ऑलिंपिक स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले आहे.
हॉकीतील आव्हान संपूष्टात
ऑलिम्पिक पात्रता फेरीत नेदरलँडकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय हॉकी टीम न्यूझीलंडकडूनही पराभूत झाली आहे. रोमांचक झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने भारताला ३-१ ने मात दिली. ऑलिम्पिकमध्ये आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे आवश्यक होते. भारताने याआधीचे दोन्ही सामने गमावले आहेत. यापूढचा सामना जर्मनीशी होणार आहे. न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यामुळे भारत आता मेडलच्या शर्यतीतून बाहेर फेकल्या गेला आहे.
तिरंदाजी : दीपिका कुमारी ऑलिंपिकमधून 'आऊट'
जलतरणस्रमाट मायकल फेल्प्सचा सर्वाधिक पदके जिंकण्याचा अनोखा विश्वविक्रम
HERO: या इंडियनने असे दिले ठोसे, प्रतिस्पर्ध्याच्या डोळ्यात आले पाणी