आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2012 Summer Olympics Medal Count: China Leads U.s. By 3 Medals ‎

LONDON OLYMPIC : चीनकडून पुन्हा अव्वल स्थान खेचण्यासाठी अमेरिकेची शर्थ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - लंडन ऑलिम्पिकला प्रारंभ झाल्यापासून पदक तालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या चीनला अमेरिकेने शनिवारी मागे टाकले. मात्र, प्रथम क्रमांकावर गेलेल्या अमेरिकेला पुन्हा मागे टाकत चीनने सोमवारी अव्वल स्थान पटकावले. चिनी खेळाडूंनी बॅडमिंटनमधील सर्व सुवर्णपदके पटकावत ऐतिहासिक कामगिरी करीत चीनला सर्वोच्च स्थानावर नेऊन ठेवले आहे. दोन्ही महासत्तांमधील ही वर्चस्वाची झुंज अत्यल्प फरकासह सुरूच असून उत्तरार्धात कोणत्या देशाचे खेळाडू अधिक सुवर्णपदके कमावतात, त्यावरच पदक तालिकेतील अव्वल स्थान निश्चित होणार आहे.
केवळ एखाद्या सुवर्णपदकाने पुढे - मागे अशीच ही झुंज सुरु असून बीजिंग ऑलिम्पिकमध्ये चीनने हिसकावून घेतलेला प्रथम क्रमांक पुन्हा अमेरिकेकडे खेचण्यासाठी अमेरिकेचे सर्वच खेळाडूदेखील जीवाचे रान करीत आहेत. मात्र चीनने बॅडमिंटनमधील सर्व सुवर्णपदके जिंकल्याने अमेरिकेचे अव्वल स्थान पुन्हा धोक्यात आले आहे. चीनच्या ‘सुपर डॅन’ने रविवारी मलेशियाच्या अव्वल मानांकित ली चोंग वेईचा पराभव करीत या सुवर्णअभियानाला प्रारंभ केला. पहिला गेम गमावल्यानंतरही पुढचे दोन गेम जिंकत त्याने सुवर्ण पटकावल्याने जणू चीनच्या सर्वच बॅडमिंटनपटूंना स्फुरण चढल्याने त्यांनी त्यानंतरची सर्व सुवर्णपदके पटकावण्याचा सपाटा लावला. त्यानंतर काई युन आणि फु हाइफेंग यांनी पुरुषांच्या डबल्समध्ये अखेरचे सुवर्णपदक आपल्या देशाच्या नावावर जमा केले. त्याआधी चीनच्या दोघा महिला टेनिसपटूंना मॅचफिक्सिंगच्या आरोपामुळे ऑलिम्पिकमधूनच माघार घेतल्याने चीनच्या आव्हानाला हादरा बसला होता. मात्र, चीनी खेळाडूंनी त्या बाबीचा खेळावर परिणाम होऊ न देता आपले विजयी अभियान कायम ठेवले.
प्रथमच पाचही पदके - चीनचे खेळाडू 1992 मध्ये बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात सर्वप्रथम सहभागी झाले. त्यानंतर अवघ्या वीस वर्षांत चीनने या खेळावर स्वत:चे अधिराज्य निर्माण केले. बॅडमिंटनमधील महिला - पुरुषांच्या सिंगल्स, डबल्स आणि संमिश्र अशा पाचही प्रकारांमध्ये सुवर्णपदक पटकावण्याची किमया चीनने प्रथमच साधली आहे. चीनच्या झो काऊने पुरुषांच्या फ्लोअर प्रकारात एकूण पाच सुवर्णपदके पटकावली आहेत.
मिसी फ्रँकलीनचा ‘सुवर्ण चौकार’ - अमेरिकेची अवघी 17 वर्षीय जलतरणपटू मिसी फ्रॅँकलीन हिने चार सुवर्णपदके जिंकत अमेरिकेच्या अ‍ॅमी वॅन डायकेन हिच्या 1996 सालच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. या पदकांसह मिसीने जलतरणातील अमेरिकेचे वर्चस्व अधोरेखित केले आहे.