आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IPL: धाेनीचा बंगळुरूवर सुपर विजय; रोमहर्षक सामन्यात चेन्नईने ५ गड्यांनी मारली बाजी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - महेंद्रसिंग धाेनीने (नाबाद ७०) विजयी षटकार ठाेकून बुधवारी ११ व्या सत्राच्या अायपीएलमध्ये सुपर विजय मिळवून दिला. या षटकाराच्या बळावर चेन्नई सुपरकिंग्जने सामन्यात विराट काेहलीच्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूवर मात केली. चेन्नईने ५ गड्यांनी राेमहर्षक विजयाची नाेंेद केली. धाेनीच्या चेन्नईचा लीगमधील हा पाचवा विजय ठरला. दुसरीकडे बंगळुरू संघाला  चाैथ्या पराभवाचा सामना करावा लागला. 


प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने चेन्नईसमाेर विजयासाठी २०६ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात चेन्नईने ५ गड्यांच्या माेबदल्यात लक्ष्य गाठले. यात अंबातीचे माेलाचे याेगदान ठरले.

 

सामनावीर धाेनी;३४ चेंडूंत नाबाद ७० धावा

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धाेनीने सामन्यात झंझावाती खेळी केली. त्याने यजमान बंगळुरूची गाेलंदाजी फाेडून काढताना विजयश्री खेचून अाणली. त्याने ३४ चेंडूंचा सामना करताना एका चाैकारासह ७ उत्तुंग षटकार ठाेकून नाबाद ७० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यासह त्याने संघासाठी विजयश्री खेचून अाणली. या वेळी त्याला अंबाती रायडूने माेलाचे याेगदान दिले. त्यामुळे चेन्नईच्या टीमचा विजयाचा मार्ग सुकर झाला. 

 

अंबाती रायडूचे सलग अर्धशतक 

चेन्नईच्या अंबाती रायडूने अापला फाॅर्म कायम ठेवताना सलग दुसरे अर्धशतक ठाेकले. त्याने बुधवारी बंगळुरूविरुद्ध ८२ धावांची खेळी केली. यापूर्वी, त्याने गत सामन्यात हैदराबादविरुद्ध ७९ धावा काढल्या  हाेत्या. अाता याच खेळीला त्याने बंगळुरूत उजाळा दिला.

 

 

पुढील स्लाईडवर पहा, सामन्याचे धावफलक........

बातम्या आणखी आहेत...