आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • After Badminton Boxing Matches Faces Fixing Problem

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FIXING : बॅडमिंटन पाठोपाठ बॉक्सिंगमध्‍येही फिक्सिंग ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- बॅडमिंटनमधील प्रकरणानंतर आता ऑलिम्पिकमधील बॉक्सिंगवरही फिक्सिंगचे सावट आले आहे. पंचावर फिक्सिंग केल्‍याचा आरोप केला जात आहे. दुस-या फेरीत क्‍युबाच्‍या लारदुएत गोमे‍जविरूद्ध पराभवानंतर बुधवारी इराणचा हेवीवेट बॉक्‍सर अली मजाहेरीने पंचावर आरोप लावला. प्रतिस्‍पर्ध्‍याला धरून उभे राहिल्‍यामुळे तीन वेळा इशारा देऊन मजाहेरीला अपात्र घोषित करण्‍यात आले. हा सामना फिक्‍स होता. पंचाने फाऊल दिले नसते तर सहजपणे माझा विजय झाला असता, असे मजाहेरीने सांगितले.
अधिकृत निकाल लागण्‍यापूर्वीच इराणचा बॉक्‍सर रिंगच्‍या बाहेर पडला होता. याविषयी विश्‍व बॉक्सिंग महासंघ (एआयबीए) म्‍हणाले की, नियमानुसार एका सामन्‍यात कोणालाही तीनपेक्षा अधिक वेळा इशारा दिला जात नाही. खेळाडू स्‍वत: अपात्र ठरतो. यापूर्वीच्‍या बेंटमवेट गटात अझरबैजानच्‍या मागोमेद अब्‍दुल हामिदेववर जपानच्‍या सातोसी सिमिजुने मिळवलेला विजय वादग्रस्‍त होता. त्‍याच्‍याविरूद्ध मागोमेदने अपील केले आहे. यावर अद्याप सुनावणी झालेली नाही.
FIXING: चीनच्या पराभवाने प्रकरण समोर आले