आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Andy Murray Wins Gold Medal In Men's Singles At London 2012

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

LONDON OLYMPIC : 101 वर्षांनंतर इंग्लंडला ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - अ‍ॅँडी मुरेने इंग्लंडच्या 101 वर्षाच्या सुवर्णपदकाचा दुष्काळ दूर करून ऑलिम्पिकचे अजिंक्यपद पटकावले. त्याने रविवारी पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये रॉजर फेडररला 6-2, 6-1, 6-4 अशा फरकाने पराभूत केले. महिनाभरापूर्वीच्या पराभवाचा वचपा काढून मुरेने फेडररला याच कोर्टवर धूळ चारली. यासह ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे फेडररचे स्वप्न भंगले. अर्जेटिनाच्या डेल जुआन मार्टिन पेत्रोने सर्बियाचा नोवाक जोकोविचला 7-5, 6-4 ने हरवून कांस्यपदक जिंकले.जगातील नंबर एक रॉजर फेडरर व इंग्लंडचा अव्वल मानांकित मुरे यांच्या सामना पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या संख्येत गर्दी केली होती. फेडरर 17 वेळचा ग्रॅण्डस्लॅम चॅम्पियन व सात वेळचा विम्बल्डन विजेता आहे.