आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FIXING: चीनच्या पराभवाने प्रकरण समोर आले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- महिला बॅडमिंटन एकेरीतील अ गटात चीनची वांग-यांग जोडी दक्षिण कोरियाच्या बिगर मानांकित जुंग क्युंग इयून-किम हा नाकडून पराभूत झाली. सामन्यांत सर्वांत मोठी रॅली अवघ्या चार शॉटची ठरली. यानंतर क गटात द. कोरियाची जोडी इयून-जुंग के इंडोनेशियाच्या जोडीकडून हरली. यांच्या पराभवानंतर अनेकांच्या मनात प्रश्‍न निर्माण झाले. दुबळ्या संघाकडून मजबूत संघांच्या पराभवात काही रहस्य तर नाही ना , या प्रश्‍नामुळे दोन्ही सामन्यांची तपासणी झाली.
हरण्यासाठी खेळत होते, चौकशीत सत्य समोर आले : अ गटात चीन आणि दक्षिण कोरिया दोन्ही संघांना पराभूत व्हायचे होते. जी टीम जिंकेल, तिचा पुढचा सामना चीनच्या मजबूत टीमशी होईल, हे दोन्ही टीमला माहिती होते. आपला पुढचा सामना ब गटातील अव्वल संघाशी होऊ नये म्हणून, क गटातही इंडोनेशिया आणि कोरियाच्या दोन्ही जोड्यांना हरायचे होते.
यामुळे झाली कारवाई : खेळाडूंनी विजयासाठी सर्वर्शेष्ठ प्रदर्शन केले नाही. ही घटना खेळभावनेच्या विरोधात आणि यामुळे आचारसंहिता भंग केल्याचे मानले गेले, असे बीडब्ल्यूएफने म्हटले. 'आम्ही या प्रकरणाची चौकशी चीन ऑलिम्पिक समितीच्या प्रमुख अधिकार्‍यांकडे सोपवली आहे. अहवाल आल्यानंतरच निर्णय घेऊ,' असे चीन महासंघाच्या प्रवक्त्याने म्हटले.
भारताला काहीच फायदा नाही : या प्रकरणामुळे भारतावर काहीच परिणाम झाला नाही. कारण मॅचफिक्सिंगचे प्रकरण अ आणि क गटातील आहेत. ज्वाला/अश्विनी ही जोडी ब गटात तिसर्‍या स्थानासह पदकांच्या शर्यतीतून बाहेर झाली. मॅचफिक्सिंग प्रकरणामुळे चार जोड्या अपात्र ठरल्याने भारतीय खेळाडूंना फायदा होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली. मात्र यात तथ्य नव्हते.
भारताची अपील फेटाळले : भारतीय बॅडमिंटन महासंघाने ब गटात जपानच्या पराभवावर चौकशीची मागणी केली होती. मात्र ही मागणी फेटाळण्यात आली.
STARS: बहिण-भावाच्या प्रेमाचा ऑलिम्पिकमध्येही साक्षात्कार...