आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Badshah Of Indian Bodybuilding, Manohar Aich Is 102 Yrs Old

हे आहेत इंडियन बॉडीबिल्डिंगचे बादशाह, वय केवळ 102 वर्षे!!!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनोहर ऐच. - Divya Marathi
मनोहर ऐच.
दिर्घायू होण्याचा जगातीत एकमेव रामबाण उपाय म्हणजे नेहमी आनंदी राहणे. असे मत 102 वर्षांचे बॉडी बिल्डर मनोहर ऐच यांनी त्यांच्या 100व्या जन्मदिनी व्यक्त केले होते. 102 वर्षांचे असूनही त्यांच्यातील जोश एखाद्या तरूणाप्रमाणेच आहे. इंडियन बॉडीबिल्डिंगचे फादर म्हणून ओळखले जाणारे मनोहर ऐच हे 1952 मध्ये पहिल्यांदा मिस्टर यूनिव्हर्स झाले होते. त्यांची उंची कमी असल्याने (4 फिट 11 इंच) त्यांना ‘पॉकिट हॉर्क्युलिस’ असेही म्हटले जाते. त्यांनी आशियन गेम्समध्ये तीन वेळा गोल्ड मेडल (1951, 1954 आणि 1958) देखील जिंकले आहे.

कसे घडले मनोहर ऐच
- 17 मार्च 1913 मध्ये 'कोमिली' जिल्ह्यातील 'धमती' या गावी त्याचा जन्म झाला. हे गाव आज बांगलादेशमध्ये आहे.
- लाहानपणापासूनच मनोहर यांना रेसलिंग आणि वेटलिफ्टिंग सारख्या खेळांची आवड होती. 12 वर्षांचे असताना ते आजरी पडले. त्यांची तब्येत अत्यंत खराब झाली होती.
- शरीर यष्टी पुन्हा कमावण्यासाठी त्यांनी प्रचंड व्यायाम केला.
- ढाका येथे शाळेत शिकत आसताना प्रसिद्ध जादूगार पीसी सरकार यांच्यासह त्यानी काम करायला सुरुवात केली.
प्रोफेशनल करियर
- मनोहर यांनी बॉडी बिल्डिंगसह 1942 मध्ये रॉयल एअरफोर्स जॉइन केले.

- रॉयल एअरफोर्समध्ये असताना एक ब्रिटिश अधिकारी रियूब मार्टिन यांनी त्यांच्यातील प्रतिभा ओळखली आणि त्यांना प्रोत्साहित केले.

- तेव्हा एका ब्रिटिश अधिकऱ्याला मारल्यामुळे मनोहर ऐच यांना शिक्षा झाली होती. तेव्हा जेलमध्येच त्यांनी वेट ट्रेनिंग सुरू केली. हे बघितल्यानंतर त्यांच्यासाठी खास डायटचे प्रयोजन करण्यात आले होते.

- 1950 ला 37 वर्षांचे असताना मनोहरयानी मिस्टर हॉर्क्युलिस कॉन्टेस्ट जिंकला होता.
- 1951मध्ये झालेल्या मिस्टर यूनिव्हर्स कॉन्टेस्टमध्ये ते दूसऱ्या स्थानावर होते. तर 1952
मध्ये त्यांनी मिस्टर यूनिव्हर्स होण्याचा मान मिळवला.
- वर्ल्ड चॅम्पियनशीप जिंकल्यानंतर 1955 मध्ये झालेल्या मिस्टर यूनिव्हर्स स्पर्धेत ते तीसऱ्या
स्थानावर आणि 1960 मध्ये झालेल्या स्पर्धेत ते चौथ्या स्थानावर होते. तेव्हा ते 47 वर्षांचे होते.
- 1960 नंतर मनोहर ऐच यांनी अनेक बॉडीबिल्डिंगचे शोज केले. त्यांनी त्यांच्या किरियरचा
शेवटचा शो 2003 मध्ये वयाच्या 90 व्या वर्षी केला होता.
खसगी जीवन
- त्यांच्या पत्नीचे नाव ज्यूथिका ऐच होते. 2002 मध्ये त्यांचे निधन झाले.
- मनोहर ऐच यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. त्यांचा एक मुलगा आखाडा चालवतो, तर दूसऱ्याचे फिटनेस हेल्थ सेंटर आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, 'पॉकेट हॉर्क्युलिस' या नावाने परिचित असलेल्या मनोहर ऐच यांचे लहानपण ते म्हातारपणिपर्यंतचे काही निवडक फोटोज...