आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bcci Demands 42 Million $ From West Indies Cricket Board

5 दिवसांत 258 कोटी द्या, अन्यथा कोर्टात जाणार; BCCIचा वेस्ट इंडिज बोर्डाला इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - वेस्ट इंडिजच्या विरोधातील पहिल्या सामन्यात आनंद व्यक्त करताना अक्षर पटेल.

मुंबई - वेस्ट इंडिज क्रिकेट टीमने भारतातील मालिका अर्ध्यातच सोडून परतण्याचा निर्णय घेतल्यामुळे झालेल्या नुकसानाच्या भरपाईपोटी बीसीसीआयने 42 मिलियन डॉलर म्हणजे सुमारे 258 कोटी रुपयांचा दावा केला आहे. बीसीसीआयने वेस्ट इंडिज बोर्डाला ही रक्कम जमा करण्यासाठी 15 दिवसांची वेळ दिली आहे. ठरलेल्या कालावधीत वेस्ट इंडिजने ही रक्कम भरली नाही तर बीसीसीआयने कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. तसेच हे प्रकरण मिटेपर्यंत दोन्ही देशांत क्रिकेटसंबंधीचे नातेही राहणार नाही.
बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष डेव्ह कॅमरन यांना चारपानी पत्र लिहिले आहे. 'इएसपीएन क्रिकइन्फो' वेबसाइट वरील एका बातमीनुसार, वेस्ट इंडिजने पंधरा दिवसांत नुकसान भरपाई न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा पेटल यांनी दिला आहे.
प्रकरण काय
वेस्ट इंडिजचा संघ ऑक्टोबरमध्ये पाच वनडे, एक टी-20 आणि तीन कसोटी सामने खेळण्यासाठी भारताच्या दौ-यावर आला होता. पण कॉन्ट्रॅक्टसंबंधी वेस्टइंडिज क्रिकेट बोर्ड आणि खेळाडुंमध्ये वाद होता. त्यामुळे मालिका अर्ध्यात सोडून परतण्याचा निर्णय विंडीजच्या खेळाडुंनी घेतला होता. त्यानुसार 17 ऑक्टोबरला झालेल्या सामन्यानंतर वेस्ट इंडिजचे सर्व खेळाडू मायदेशी परतले होते.
प्रकरण मिटवण्याचे वेस्ट इंडिज बोर्डाचे प्रयत्न
वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने त्यांच्या खेळाडुंबरोबर असलेले मतभेद मिटवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. बीसीसीआयने नोटीस पाठवण्यापूर्वी बोर्डाच्या अधिका-यांनी त्यांच्या खेळाडुंबरोबर त्रिनिदाद येथे एका बैठकीत चर्चा केली. यात सेंटविंसेंटचे पंतप्रधान राल्फ गोन्साल्वेस यांचीही उपस्थिती होती. राल्फ यांनी तीन वर्षांपूर्वी ख्रिस गेल आणि वेस्ट इंडिज बोर्डात झालेला वादही सोडवला होता.