आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

OLYMPIC: बॉक्सिंगपटू जय भगवान पराभूत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- बॅडमिंटनमध्ये भारताच्या आशा अजूनही कायम आहेत. स्टार शटलर सायना नेहवालने डेन्मार्कच्या बॉन टिनेवर मात केली आहे. या विजयासह सायनाने महिला सिंगल्सच्या सेमीफायनलमध्ये जागा पक्की केली आहे.
सायनाने बॉनला क्वॉर्टर फायनलच्या सामन्यात २१-१५, २२-१० अशी मात दिली. सायनाने याआधी हॉलंडच्या खेळाडूला मात देऊन क्वॉर्टर फायनलमध्ये प्रवेश केला होता.
बॉक्सिंगपटू जय भगवान पराभूत
बॉक्सिंगमध्‍ये भारताच्‍या पदरी निराशा पडली आहे. 60 किलोग्रॅम वजनी गटात भारताच्‍या जय भगवानला पराभवाला सामोरे जावे लागले. कझाकिस्‍तानच्‍या गनी जइलाउओवने त्‍याला पराजित केले. आज मध्‍यरात्री 2 वाजता 75 किलोग्रॅम वजनी गटात विजेंद्रची लढत अमेरिकेच्‍या टेरेल गॉशाशी होणार आहे. या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
OLYMPIC सहावा दिवस: बॅडमिंटनचा नवा स्‍टार आणि रॉजर फेडररला 'दे धक्‍का'
OLYMPIC: हैतीच्‍या खेळाडूचे फेसबुकला साकडे !
OLYMPIC: आखाड्यात चक्‍क अश्रूंच्‍या धारा !