आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लंडन - अँन्डी मरेने टेनिसच्या पुरूष सिंगलमध्ये ब्रिटेनला गोल्ड मेडल जिकून दिले आणि 104 वर्षांचा दुष्काळ अखेर संपला. अंतिम सामन्यात स्विस किंग रोजर फेडररला 6-2,6-1, 6-4 ने हारवले. या पराभवामुळे फेडररचे ऑलिम्पिक सिंगल्स स्पर्धेत पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले.
अर्जेटीनाच्या जुआन डेल पोत्रोने या आधीचा नंबर एकचा खेळाडू सर्बिया जोकोविचला 7-5,6-4 ने हरवले होते आणि कास्य पदक पटकविले होते. जगातील नंबर एक असणा-या फेडरर आणि ब्रिटिशचा नंबर एक मरे यांच्या सामनन्या दरम्यान विबल्डन खचाखच भरलेले होते. फेडररने 17 वेळेस ग्रॅडस्लॅम चॅम्पियन आणि 7 वेळेस विबल्डन चॅम्पियने जिंकली आहे. फेडररने मागच्या महिन्यात विंबल्डनच्या अंतिम सामन्यात मरेलाला याच कोर्टवर हरवले होते.
मरे याच्या आधी टेनिन पुरूष सिंगल्समध्ये ब्रिटेनचा शेवटचा ऑलिम्पिक चॅम्पियन रिची जोसेह हा होता. त्याने 1908 मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकले होते. लॉरेंस डोहर्टी (1900) आणि ज़ॉन बोलॅंड (1896) मध्ये या सपर्धेत गोल्ड मेडल जिंकले आहे. फोटोतून पाहा सामना जिंकल्यानंतर सरळ प्रेमिकेकडे धावला अँन्डी मरे ...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.