आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bronze In London Is Like Gold For Me, Says Russian Pole Vault Queen Yelena Isinbayeva

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

LONDON OLYMPIC : येलेनाच्या साम्राज्याला सुरूंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - मागील दोन ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेती रशियाची पोलव्हॉल्टपटू येलेना इसिनबोवा हिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. अमेरिकेच्या सूहर हिने 4.75 मीटर उंच उडी मारुन सुवर्णपदक तर क्युबाच्या यारस्ले सिल्व्हा हिने रौप्यपदक पटकावले.
सर्जेई बुबकापासून रशियाने पोल व्हॉल्ट (बांबूउडी) या खेळामध्ये स्वत:ची मक्तेदारी निर्माण केली होती. बुबकानंतर येलेनासारख्या महिलांनीदेखील ते साम्राज्य कायम राखले होते. मात्र यावेळी येलेनाला केवळ 4 .70 मीटर इतकीच उडी मारता आल्याने तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. बीजिंग ऑलिम्पिकनंतर मला अनेक संकटांचा मुकाबला करावा लागला. त्यामुळे हे कांस्यपदकदेखील मला अत्यंत मोलाचे आहे. मात्र, त्यावर मी समाधानी नाही. मी नेहमी सुवर्णपदक जिंकण्यासाठीच खेळत आले आहे. येलेना प्रदीर्घ काळापासून या क्रीडाप्रकारातील अनभिषिक्त सम्राज्ञी आहे. ऑलिम्पिकच्या दोन सुवर्णपदकांसह 2005 आणि 2007च्या जागतिक चॅम्पियनशीपदेखील तिच्या नावे जमा आहेत.
2013 च्या स्पर्धेत पुनरागमनाचा विश्वास - या ऑलिम्पिकमधील कामगिरी आपल्या लौकीकाला साजेशी झालेली नसल्याचे तिने सांगितले. मात्र सुदैवाने मला 2013 च्या जागतिक पोलव्हॉल्ट स्पर्धेसाठी तयारी करायला चांगला वेळ मिळणार आहे. तसेच ही स्पर्धा यंदा रशियातच मॉस्कोला होणार असल्याने मला माझ्या घरच्या प्रेक्षकांसमोर सर्वोत्तम खेळ दाखविण्याची संधी मिळणार असल्याचेही येलेनाने नमूद केले. ही स्पर्धा प्रथमच रशियात होणार असून त्यात मी सुवर्णपदक मिळविण्याचाच प्रयत्न करणार आहे.ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक हुकण्याची बाब माझ्या अत्यंत जिव्हारी लागली असल्याचे येलेनाने नमूद केले.
निवृत्तीचा निर्णय मागे - या ऑलिम्पिकमध्ये मला कांस्यपदक मिळाले असल्याने मी पोल व्हॉल्टमधून निवृत्ती घेण्याचा माझा विचार बदलला आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक कमावून सुवर्ण हॅट्ट्रिक केल्यावर पोल व्हॉल्टला अलविदा करण्याचा तिचा विचार होता. मात्र, माझ्या करिअरची अखेर कांस्यपदकाने व्हावी, हे मला मान्य नाही. त्यामुळेच मी निवृत्तीचा माझा निर्णय मागे घेतला आहे. मी कदाचित रियोमधील पुढच्या ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचा
विचार करू शकते. - येलेना इसिनबोवा, पोल व्हॉल्टपटू, रशिया
खेळावर लक्ष केंद्रित केले - 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये मला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. त्या अनुभवाने मला खूप काही शिकवले होते. तसेच जेव्हा येलेना समोर असते, त्या वेळी आव्हान खूपच उंच आणि अवघड बनत जाते हे मला ज्ञात होते. तुम्ही केवळ तुमच्या खेळावर लक्ष केंद्रित करणे इतकेच तुमच्या हातात असते आणि तेच मी केले. मी जिंकल्याचा मला आनंद आहे, मात्र येलेनाबाबत खूप आदर आहे. -सुहर , सुवर्णपदकविजेती