आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाय..बाय..इंचियोन ! जपानचा कोसुके हॅगिनो सर्वश्रेष्ठ खेळाडू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंचियोन - डोळ्यांचे पारणे फेडणारी आतषबाजी, सुरेल संगीत, ड्रम, संगीताच्या तालावर थिरकणारे चाहते, स्थानिक कलाकारांची नेत्रदीपक प्रस्तुती आणि खचाखच भरलेल्या स्टेडियमवर सतराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा रंगारंग समारोप सोहळा शनिवारी उत्साहात पार पडला. समारोप सोहळ्यात जपानचा जलतरणपटू कोसुके हॅगिनो याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्याने या स्पर्धेत चार सुवर्णासह एकूण ७ पदके जिंकली.

आकाशात डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या आतषबाजीसह समारोप सोहळ्याला सुरुवात झाली. यानंतर कोरियन आणि आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या ध्वजाला घेऊन खेळाडू स्टेडियममध्ये आले. यापाठोपाठ स्पर्धेत सहभागी झालेल्या देशांचे सर्व खेळाडू आपापल्या देशाच्या ध्वजासह स्टेडियममध्ये दाखल झाले. खेळाडूंच्या प्रवेशासह संपूर्ण स्टेडियम टाळ्यांचा कडकडाट आणि आनंदासह भरून निघाले. हातात तिरंगा घेऊन भारतीय खेळाडूसुद्धा स्टेडियममध्ये दाखल होताच, चाहत्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले.
गुगाक सेंटर डान्स ग्रुपच्या कलाकारांनी मनमोहक नृत्य करून चाहत्यांची मने जिंकली. दक्षिण कोरियन गर्ल्स ग्रुपने "सिस्तार'ची प्रस्तुती केली. कोरियाचा पॉपबँड िबग बँगच्या तालावर चाहत्यांसह खेळाडूसुद्धा थिरकले. शेख अल सबाह यांनी समारोप सोहळ्यात दक्षिण कोरियाचे १७ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आभार मानले. पुढची स्पर्धा जकार्ता येथे होणार असल्याचे जाहीर होताच इंडोनेशियाच्या खेळाडंूचे आनंदाने डोळे चमकले.
हे वादही राहिले चर्चेत
- एल. सरितादेवीने पंचांकडून जाहीर निर्णयावर नाराजी व्यक्त करताना पुरस्कार सोहळ्यात कांस्यपदक स्वीकारण्यास नकार दिला.
- कतार बास्केटबॉल संघाला हिजाब घालून खेळण्यास परवानगी न मिळाल्याने त्यांनी या खेळावर बहिष्कार टाकला.
- लंच बॉक्समध्ये सुमार दर्जाचे जेवण मिळाल्याने सप्लायरला हाकलले.
- दोन आठवडे रंगलेल्या या स्पर्धेदरम्यान रिकाम्या स्टेडियममुळे आयाेजन समितीच्या कामावर प्रश्नचिन्ह िनर्माण झाले.
- डोिपंगचा वाद : स्पर्धेत सहा खेळाडू डोपिंग चाचणीत अडकले.