आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालंडन- जागतिक टेनिसमधील नंबर एकचा खेळाडू स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला अर्जेंटीनाच्या जुआन मार्टिन डेल पोत्रोने विजयासाठी जबरदस्त झुंजवले. तब्बल चार तास 26 मिनिटे इतका विक्रमी वेळ चाललेला हा सामना फेडररने जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला.
विंबल्डन विजेत्या फेडररने मार्टिनला 3-6, 7-6 आणि 19-17 असे पराभूत करून पुरूष एकेरीच्या फायनलमध्ये प्रवेश केला. यामधील शेवटचे सेट दोन तास 43 मिनिटे चालला. व्यावसायिक स्पर्धेत तीन सेटमध्ये सर्वात जास्त वेळ चाललेला हा सामना ठरला.
पहिला सेट 36 मिनिटे चालला. हा सेट 3-6 ने पराभूत झाल्यानंतर फेडररने दुसरा सेट 67 मिनिटांनी टायब्रेकमध्ये जिंकला. मात्र तिसरा सेट खूप वेळ चालेल याची कोणालाच अपेक्षा नव्हती. फेडररने आपल्या कारकीर्दीतील इतका दीर्घकाळ चालणारा सेट कधीच खेळला नव्हता.
मार्टिन शेवटच्या सेटमध्ये 17-16 ने पिछाडीवर होता आणि त्याच्याकडे सामना जिंकण्याची संधी होती. मात्र फेडररने 17-17 अशी बरोबरी केली. आणि मार्टिनची सर्व्हिस तोडून 18-17 अशी आघाडी घेतली. त्याने 36 व्या गेममध्ये सर्व्हिस स्वत:कडे कायम ठेवली आणि फायनलमध्ये प्रवेश केला.
महिला एकेरीचा फायनलचा सामना रशियाच्या मारिया शारापोव्हा आणि विंबल्डन चॅम्पियन अमेरिकेच्या सेरेना विल्यम्स यांच्यात होणार आहे.
OLYMPIC: भारताची कृष्णा पुनिया अंतिमफेरीत
OLYMPIC: सेंट्रल लंडन नव्हे, हे तर भुतांचे शहर!
OLYMPIC : भारताशी धोका, विकासला विजयानंतरही पराभूत घोषित केले
OLYMPIC: भारतीय हॉकी संघाचा सलग तिसरा पराभव
OLYMPIC: विजयकुमारने भारताला मिळवून दिले पहिले रौप्य पदक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.