आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • In Fencing Competition South Korean Star Player Shin Laam Crying In Stadium

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

OLYMPIC: आखाड्यात चक्‍क अश्रूंची धार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- तलवार हातात असणा-यांच्‍या डोळयात काय दिसले पाहिजे- उसळते रक्‍त, उग्रता, आक्रमकता मात्र लंडन ऑलिम्पिकमध्‍ये एका सामन्‍यानंतर दक्षिण कोरियाची तलवारबाज शिन लामच्‍या डोळयात चक्‍क अश्रू आले होते.
उपांत्‍य फेरीत पराजित झाल्‍यानंतर ती अक्षरश: ओक्‍साबोक्‍शी रडू लागली. तिच्‍या रडण्‍यामागचे कारणही खासच होते. झालं असं की, सामना सुरू असताना तिला आणि तिच्‍या प्रशिक्षकाला ती जिंकल्‍यासारखे वाटले. जेव्‍हा त्‍यांनी घडाळयाकडे पाहिले तर ते रिसेट करण्‍यात आले होते. शून्‍य असलेली वेळ अचानक एक वर आली.
ही वेळ मिळताच मागील वेळची सुर्वण पदक विजेत्‍या जर्मनीच्‍या तलवारबाजने तिच्‍यावर वार करून तिला आवश्‍यक असलेला गुण मिळवला आणि ती अंतिम फेरीत पोहोचली.
त्‍यानंतर चिडलेल्‍या दक्षिण कोरियाच्‍या प्रशिक्षकाने निर्णयाविरोधात अपील केले. परंतु, अपील फेटाळण्‍यात आले आणि शिन लामच्‍या डोळयात पुन्‍हा अश्रू आले. इतकंच नव्‍हे तर ती स्‍पर्धेच्‍या ठिकाणाहून हटण्‍यासही तयार नव्‍हती.
त्‍यावेळी एक अधिकारी तिची समजूत काढण्‍यासाठी आले. तरीसुद्धा ती तेथून हलण्‍यास तयार नव्‍हती. शेवटी ती सामना संपल्‍यानंतर एका तासाने तेथून परतू लागली. ती रडत रडत आखाडयाच्‍या बाहेर येत होती आणि प्रेक्षक जोरात टाळया वाजवत होते. लोक खूश होते. कारण दर्शक आले होते गंभीर सामना पाहायला. मात्र त्‍यांना येथे वेगळाच ड्रामा पाहायला मिळाला. ज्‍यामध्‍ये होते रहस्‍य-रोमांच-अ‍ॅक्‍शन-इमोशन म्‍हणजेच सर्व मसाला.
OLYMPIC LIVE: रंजन सोढीकडून भारताला सुवर्णपदकाची अपेक्षा
OLYMPIC सहावा दिवस: बॅडमिंटनचा नवा स्‍टार आणि रॉजर फेडररला 'दे धक्‍का'
OLYMPIC दृष्‍टीक्षेप: इंग्‍लंडला पहिले सुवर्णपदक; फेडरर, सेरेनाची आगेकूच
OLYMPIC: एका छोट्याशा चुकीने पदक विजेता झाला निराश !
OLYMPIC पाचवा दिवस: देवेंद्रो सिंगचा दम तर भूपती-बोपण्‍णाची हार
OLYMPIC: अपयशाने निराश झालेला नाही बिंद्रा