आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

OLYMPIC LIVE: रंजन सोढीकडून भारताला सुवर्णपदकाची अपेक्षा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- लंडन ऑलिंपिक, 2012 मध्ये गुरुवारी भारताला डबल ट्रैप शूटिंगमध्ये रंजन सोढी याच्याकडून फारच होत्या. मात्र, तो अंतिम फेरीत पोहचण्यास अपयशी ठरला. पहिल्या फेरीत त्याने ५० पैकी ४८ गुण घेऊन उत्तम सुरुवात केली होती. मात्र सोढीला दुस-या व तिस-या फेरीत ती लय राखण्यास अपयश आले. त्याला दुस-या फेरीत ५० पैकी ४४ तर तिस-या व अंतिम फेरीत ५० पैकी केवळ ४२ गुण मिळवता आले. त्यामुळे त्याला १५० पैकी १३४ गुणावरच समाधान मानावे लागले. दुस-या व तिस-या फेरीतील खऱाब कामगिरीमुळे त्याला पहिल्या स्थानावरुन ११ व्या क्रमाकांवर जावे लागले.

या प्रकारांपैकी भारताच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचा आणि ज्या प्रकारातून भारताला पदकाची अपेक्षा असलेला क्रीडा प्रकार म्हणजे डबल ट्रॅप. या क्रीडा प्रकारात भारताला रंजनसिंग सोढी यांच्याकडून पदकाची आस लागली होती. पहिल्या फेरीनंतर सोढी पहिल्या क्रमांकावर आला होता. त्याने पहिल्या फेरीत ५० पैकी ४८ गुण घेतले. सोढी याच्याएवढेच त्याचे प्रतिस्पर्धी फ्रांसिस्को डी एनिलो, वैसिली मोजिन, पीटर रॉबर्ट रसेल यांना पहिल्या फेरीत गुण मिळाले होते. मात्र, सोढी दुस-या फेरीत ढेपाळला. त्याला ५० पैकी केवळ ४४ गुण घेता आले. त्यामुळे दुस-या फेरीअखेर तो ६ व्या क्रमाकांवर फेकला गेला. तिस-या व अंतिम फेरीत त्याला किमान ५० पैकी ४८ गुण जिंकणे आवश्यक होते. मात्र दबावात आलेल्या सोढीची तिस-या फेरीत आणखीच खराब कामगिरी झाली. शेवटच्या फेरीत त्याला ५० पैकी केवळ ४२ गुण मिळवता आले. त्यामुळे पहिल्या फेरीत प्रथम व दुस-या फेरीत ६ व्या क्रमाकांवर फेकल्या गेलेल्या रंजनला अखेर ११ वे स्थानावर समाधान मानावे लागले. तो जर पहिल्या ६ क्रमाकांत राहिला असता तर त्याला अंतिम फेरीत खेळता आले असते.
OLYMPIC: आखाड्यात चक्‍क अश्रूंच्या धारा
OLYMPIC सहावा दिवस: बॅडमिंटनचा नवा स्‍टार आणि रॉजर फेडररला 'दे धक्‍का'