आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • India vs sri lanka 5th odi score sehwag out From Team

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

CRICKET LIVE : भारताची प्रथम फलंदाजी, जखमी सेहवागऐवजी रहाणेला संधी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलंबो - भारताने दिलेले 295 धावांचे आव्हान न पेलवल्याने श्रीलंकेचा पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात 21 धावांनी पराभव झाला. गौतम गंभीर, मनोज तिवारी आणि धोनीने केलेल्या तडाखेबंद खेळीनंतर इरफान पठाणने पाच बळी घेत श्रीलंकेला हादरा दिला. या विजयामुळे भारत एकदिवसीय सामन्यांच्या क्रमवारीत 2 नंबरचे स्थान पटकावले आहे.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. रहाणे, रोहित शर्मा व रैना वगळता अन्य सर्व फलंदाजांच्या फटकेबाजीने भारताने श्रीलंकेसमोर 295 धावांचे आव्हान ठेवले. श्रीलंकेची सुरुवात पडझडीने झाली. दिलशान बाद झाल्यानंतर थरंगा व थिरीमाने यांनी अर्धशतकी भागीदारी केली. थरंगाला पठाणने व चांदीमलला दिंडाने बाद केल्यावर लंकेचा डाव डळमळला. थिरीमानेने 77 धावांची खेळी केली. 5 बाद 102 अशा परिस्थितीतून परेरा-मेंडीस यांच्या भागीदारीने लंकेचा डाव सावरला. पठाणने दोघांनाही बाद केले. मलिंगा रैनाकडे झेल देऊन बाद झाल्याने श्रीलंकेचा डाव 47.2 षटकात 274
धावांमध्येच संपुष्टात आला. सेहवागऐवजी संघात स्थान मिळालेला अजिंक्य रहाणे 9 धावा काढून तंबूत परतला. गंभीरसोबत अर्धशतकी भागीदारी केल्यानंतर कोहली 23 धावांवर बाद झाला. रोहित शर्माही 4 धावांवर परतला. मनोज तिवारीने अर्धशतक झळकावले. गंभीर सेनानायकेच्या गोलंदाजीवर 88 धावांवर बाद झाला. तिवारी 65 धावांवर बाद झाल्यानंतर आलेला सुरेश रैना भोपळा न फोडता बाद झाला. मात्र कर्णधार धोनीने त्यानंतर केलेली तडाखेबंद खेळी केली.
संक्षिप्त धावफलक
भारत- 50 षटकांत 7 बाद 294- गंभीर 88, तिवारी 65, धोनी 58, मलिंगा 64 /3 श्रीलंका - सर्वबाद 274 थिरीमाने 77 , मेंडीस -72, पठाण 61/5 )
गंभीरच्या ८८ धावा- सलामीवीर अजिंक्य रहाणे केवळ ९ धावावर बाद झाल्यानंतरही एका बाजूने सतत आक्रमक फलंदाजी करीत गौतम गंभीरने श्रीलंकन गोलंदाजावर वर्चस्व मिळवले. त्याने प्रथम रहाणेबरोबर २९ धावाची भागीदारी केली. त्यानंतर त्याने मनोज तिवारीला सोबत शतकी भागीदारी करीत भारताला दोनशेचा टप्पा गाठून दिला. मात्र तिवारी (६५) बाद होताच तो सचित्र सेनानायकेच्या गोलंदाजीवर मलिंगाकडे झेल देऊन बाद झाला. त्याने ९९ चेंडूत सात चौकारासह ८८ धावा ठोकल्या.
तिवारीचा जलवा कायम- या मालिकेत मनोज तिवारीला पाच पैकी केवळ दोन सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. या दोन्हीही सामन्यात त्याने चमकदार कामगिरी केली. पहिल्या सामन्यात ४ गडी टिपणा-या तिवारीने आजच्या सामन्यात मोक्याची क्षणी ६५ धावांची खेळी साकारली. त्याने गौतम गंभीरबरोबर ११० धावांची भागीदारी रचली. त्याने ६८ चेंडूत ६ चौकारासह ६५ धावा केल्या. मात्र मलिंगाच्या एका उसळत्या चेंडूचा अंदाज न आल्याने परेराच्या हाती झेल देऊन परतला.
सलामीचा फलंदाज वीरेंद्र सेहवाग जखमी असल्याने त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. संघात तो नसल्याने अजिंक्य रहाणेला सलामीला पाठविण्यात आले होते. मात्र तो केवळ ९ धावा काढून परेराच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर त्याच्या जागेवर विराट कोहली खेळायला आला. रहाणे बाद झाला तरी गौतम गंभीरने आपल्या नैसर्गिक खेळाला मुरड घातली नाही. तो आक्रमक फलंदाजी करीत ४९ चेंडूत ७ चौकारासह अर्धशतक झळकावले. विराट कोहलीने त्याला साथ देण्याचा प्रयत्न केला मात्र दोन चौकारासह २३ धावा केल्यावर प्रदीपने त्याला पायचीत केले. त्यानंतर त्याच्या जागेवर खेळायला आलेल्या रोहित शर्मालाही प्रदीपने अवघ्या चार धावावर त्रिफळाचीत केले.
आज गंभीरने महेला जयवर्धनेच्या जागी कर्णधारपद संभाळत असलेल्या मॅथ्यूजच्या गोलंदाजीवर हल्ला चढविला. त्याच्या तीन षटकात कोहली-गंभीर जोडीने २४ धावा लुटल्या. त्यानंतर त्याने आपल्या जागी प्रदीपला गोलंदाजी दिली व त्याने भारताला कोहलीसह लागोपाठ दोन धक्के दिले.
टीम इंडिया ढेर श्रीलंका शेर, भारताचा दारूण पराभव
श्रीलंका दौरा - भारतीय संघाची विजयी लय कायम ठेवण्याचे प्रयत्न