आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Sikh Players In China Have Been Forced To Remove Turban

चीनमध्ये भारतीयांचा अपमान; शिख बास्केटबॉल खेळाडूंची पगडी उतरवली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - अमृतपाल सिंह आणि एमिज्योत सिंह

चंदीगड -
चीनमध्ये नुकत्याच झालेल्या आशिया चषकात भारतीय बास्केटबॉल संघाच्या खेळाडूंना पगडी उतरवण्यास भाग पाडले. आयोजकांनी त्यांना पगडी घालून खेळण्यास नकार दिला होता. क्रीडा मंत्रालयाने या घटनेवर तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती (आयओसी) यांना पत्र लिहून या संबंधी मार्गदर्शक तत्वे स्पष्ट करण्यास सांगितले आहे. जेणेकरून अशा प्रकारची दुसरी कोणतीही घटना घडणार नाही.

चीन येथील आशिया चषकात भारताचा सामना जापानसोबत होता. 12 जुलैला वुहानमध्ये होणार्‍या या सामन्याआगोदर भारताच्या अमृतपाल सिंह आणि एमिज्योत सिंह यांना पगडी उतरवण्यास सांगण्यात आले. सामन्याच्या अधिकार्‍यांनी त्यांना तुम्ही पगडी घालून खेळू शकत नाही असे सांगितले. यामुळे त्यांना नाईलाजाने पगडी काढून सामन्यात उतरावे लागले. याबाबतीत एमिज्योत म्हणाला की, " मी या पूर्वीही अनेक आंतरराष्ट्रीय सामने खेळलो आहे. मात्र अशी घटना कधीच घडली नाही. आशिका चषकात असे का घडले मला माहित नाही. आम्ही आयोजकांना पत्रा पाठवून याबद्दलचे स्पष्टीकरण मागितले आहे. आम्ही उत्तराची वाट पाहात आहोत. उत्तर मिळाल्यावरच योग्य ती कार्यवाही करण्यात येईल."

बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया -

हे आहेत नियम
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल महासंघ (फिबा) च्या कलम 4.4.2 मध्ये यासंबंधी नियम आहे. या नियमानुसार खेळाडू अशी कोणतीच वस्तू अथवा वस्त्र परिधान करणार नाही ज्यामुळे खेळाडूंला इजा होणार नाही. उदा. हेडगेअर, ज्वेलरी इत्यादी. मात्र पगडीने कोणालाही काहीच इजा होण्याचा प्रश्नच येत नाही.
पुढील स्लाईडवर पाहा, अमृतपाल सिंह आणि एमिज्योत सिंह यांचे काही फोटो...