आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लंडन- बुधवारी पारूपल्ली कश्यपने श्रीलंकेचा स्टार बॅडमिंटनपटू निकुला करूणारत्नेचा पराभव करून उप उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उप-उपांत्य फेरीत पोहोचणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे.
विजयानंतर बोलताना त्याने, पुढच्या सामन्यात 100 टक्के प्रदर्शन करणार असल्याचे सांगितले. बीबीसीशी झालेल्या चर्चेत कश्यप म्हणाला, 'माझा पुढचा सामना जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या खेळाडूंबरोबर होण्याची शक्यता आहे. हा सामना खूप कठीण असेल. पण मी त्यासाठी पूर्ण तयार आहे. मी या सामन्यासाठी 100 टक्के प्रदर्शन करेल.'
कश्यपने करूणारत्नेचा 21-14, 15-21 आणि 21-9 असा पराभव केला. यापूर्वी 1992 मध्ये बार्सिलोना ऑलिम्पिकमध्ये दीपांकर भट्टाचार्य तिस-या फेरीपर्यंत पोहोचला होता.
करूणारत्नेच्या सामन्याबाबत बोलताना तो म्हणाला,' पहिल्या सेट मध्ये मी खूप आक्रमक होतो. दुस-या सेटमध्ये मी रॅली बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र करूणारत्नेने खूप चांगला खेळ केला. त्यामुळे माझ्यावर थोडा दबाव आला होता. परंतु, मी स्वत:ला सांभाळले.'
लंडन ऑलिम्पिकला जाण्यापूर्वी संभाव्य पदक मिळवणा-या खेळाडूंच्या यादीत कश्यपचा समावेश नव्हता. याबद्दल त्याला विचारले असता त्याने म्हटले,' मी अंडर डॉग होतो. त्यामुळे माझ्यावर कोणताही दबाव नव्हता.
OLYMPIC: एका छोट्याशा चुकीने पदक विजेता झाला निराश !
OLYMPIC पाचवा दिवस: देवेंद्रो सिंगचा दम तर भूपती-बोपण्णाची हार
OLYMPIC: अपयशाने निराश झालेला नाही बिंद्रा
OLYMPIC चौथा दिवस: सायनाची घौडदौड सुरूच तर सांगवान ठरला दुर्दैवी
OLYMPIC : चीनी जलतरणपटूविरोधात डोपिंगची शंका
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.