आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल 2014 साठी खेळाडूंचा लिलाव 12 फेब्रुवारीला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आयपीएल सातच्या 2014च्या हंगामासाठी खेळाडूंच्या लिलावासाठी 12 व 13 फेब्रुवारी हे दोन दिवस आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने मंगळवारी निश्चित केले. आगामी आयपीएलसाठी खेळाडू व फ्रँचायझींसाठी नवी आचारसंहिता, नियमही कौन्सिलने निश्चित केले. यापुढे प्रत्येक आयपीएल फ्रँचायझीसाठी किमान 16 आणि कमाल 27 खेळाडूंची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
या खेळाडूंपैकी परदेशी खेळाडूंचे प्रमाण 9 एवढे असेल. अंकित अकरा खेळाडूंत मात्र, चारच विदेशी खेळाडू असतील. ‘राइट टू मॅच’ या नावाने गत खेळाडूंना कायम राखण्याची संख्या पाचपर्यंत वाढवण्यात आली आहे. या पाच खेळाडूंसाठी अनुक्रमे त्या त्या फ्रँचायझींकडून 12.5, 9.5, 7.5, 5.5 व 4 कोटी रुपये आयपीएल फ्रँचायझी फीशिवाय द्यावे लागतील. 2013 च्या संघातील ज्या प्रमाणात खेळाडूंना फ्रँचायझीच्या वतीने आपल्याकडे राखण्याचा अधिकार गाजवता येईल. तेवढीच ‘राइट टू मॅच’मुळे लिलावात घेण्याची संख्या कमी होणार आहे.

आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने घेतले काही महत्त्वाचे निर्णय
खेळाडूंना पुढील एक किंवा दोन वर्षांसाठी कायम ठेवता येईल. सर्व आयपीएल खेळाडूंचे मानधन भारतीय चलनातच निश्चित करण्यात येईल.
परदेशी खेळाडूंना त्यांच्या पसंतीच्या परकीय चलनात मानधन घेण्याची मुभा आहे. ते मानधन निश्चित तारखेच्या दरानुसार देण्यात येईल.
खेळाडूला 6 मान्यताप्राप्त मित्रत्वाचे सामने विनामूल्य खेळावे लागतील. चॅम्पियन्स लीगमध्ये खेळण्यासाठी मात्र खेळाडूंना आयपीएल लीग फीच्या 10 टक्के एवढे मानधन खेळण्यासाठी मिळेल.
19 वर्षांखालील खेळाडूला करारबद्ध करताना त्याने प्रथम दर्जाचा सामना खेळणे गरजेचे आहे.
आयपीएल फ्रँचायझींसाठी संघातील खेळाडूंच्या मानधनासाठी एकूण 60 कोटी रुपयांची र्मयादा घालण्यात आली आहे.
फ्रँचायझींना 2013 च्या संघातील, कमाल 5 खेळाडूंना कायम ठेवता येईल. त्यापैकी 4 पेक्षा अधिक भारतीय खेळाडू असता कामा नयेत. 10 जानेवारी 2014 पूर्वी तसे करारपत्र बीसीसीआयला द्यावे लागेल.