आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jara Philips Get Silver Medal In Olympic Horse Riding Competition

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराणीच्‍या नातीने जिंकले रौप्‍य पदक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- इंग्‍लंडची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची नात जारा फिलिप्‍स ऑलिम्पिक पदक जिंकणा-यामध्‍ये सहभागी झाली आहे. मंगळवारी सांघिक हॉर्स रायडिंगमध्‍ये यजमान इंग्‍लंडने रौप्‍यपदक पटकावले. जारा ही या संघाची सदस्‍य आहे. 31 वर्षीय जाराचे हे पहिले ऑलिम्पिक पदक आहे. तिच्‍याशिवाय पीट विल्‍यम, निकोला विल्‍यम, मेरी किंग व क्रिस्टिना कुक हेदेखील रौप्‍यपदक विजेत्‍या संघाचे (138.2), सदस्‍य होते. जर्मनीने (133.7) सुवर्ण व न्‍यूझीलंडने (144.4), कास्‍यपदक जिंकले. वैयक्तिक स्‍पर्धेतील सुवर्णपदक जर्मनीच्‍या मायकल जुंगच्‍या नावे राहिले. स्‍वीडनची सारा अल्‍गोटसनला रौप्‍य व जर्मनीच्‍या सांद्रा अफरॉहला कास्‍यपदक मिळाले. जार फिलिप्‍स आठव्‍या स्‍थानावर राहिली.