आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OLYMPIC 10 वा दिवस: पॉवेलचा पराभव आणि जोकोव्हिचचे दुर्दैव

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिट
मेरी कोमची अपेक्षा
भारतीय महिला बॉक्‍सर मेरी कोमकडून सर्वांनाच अपेक्षा होत्‍या. मात्र पात्रता फेरीत तिला कडवा संघर्ष करावा लागला. लंडन ऑलिम्पिकमधील आपल्‍या पहिल्‍याच सामन्‍यात तिने आपले इरादे स्‍पष्‍ट केले आहेत.
ऑलिम्पिकमध्‍ये तिला कोणत्‍याच प्रकारची जोखीम घ्‍यायची नाही. तिने भारताला आणखी एक पदक मिळण्‍याच्‍या आशा जिवंत केल्‍या आहेत. मेरी कोमला तिच्‍या सामन्‍याचा पहिला दिवस खासच होता. कारण याच दिवशी तिच्‍या जुळ्या मुलांचा वाढदिवस होता. आपल्‍या मुलांच्‍या वाढदिवसादिवशी ती त्‍यांच्‍या बरोबर नसल्‍यामुळे विजयानंतरही तिच्‍या डोळयात अश्रू तरळले होते. मात्र त्‍यांच्‍या वाढदिवसादिवशीच विजय मिळाल्‍यामुळेही ती आनंदात होती.
अँडी मरेचा बदला
ब्रिटनच्‍या अँडी मरेला यावर्षी विंबल्‍डनच्‍या फायनलमध्‍ये स्वित्‍झर्लंडच्‍या रॉजर फेडररने पराभूत केले होते. मात्र ऑलिम्पिकमच्‍या फायनलमध्‍ये त्‍याने फेडररवर मात करून विंबल्‍डनचा बदला घेतला. आपल्‍या घरच्‍या प्रेक्षकांसमोर मरेने फेडररला निष्‍प्रभ ठरवले. सरळ सेट्समध्‍ये फेडररचा पराभव करताना त्‍याने सुवर्ण पदक आपल्‍या नावे केले.
सेरेनाला सुवर्ण
महिला एकेरीच्‍या टेनिसचे सुवर्ण पदक पटकाविणा-या अमेरिकेच्‍या सेरेना विल्यिम्‍सने आणखी एक सुवर्ण पदक आपल्‍या नावे केले. महिलांच्‍या दुहेरीत तिने आपली व्‍हीनसच्‍या साथीने झेक गणराज्‍याच्‍या आंद्रिया हलावचकोव्‍हा आणि ल्‍युसी हराडेकाचा 6-4,6-4 असा पराभव केला. वर्ष 2008 च्‍या सिडनी ऑलिम्पिकमध्‍येही दोन्‍ही बहिणींनी महिला टेनिसच्‍या दुहेरीचे विजतेपद पटका‍वले होते.
अभेद्य चिनी किल्‍ला
ऑलिम्पिकमध्‍ये बॅडमिंटनच्‍या सर्व पाच प्रकारांच्‍या स्‍पर्धांच्‍या सुवर्णपदकावर चीनने कब्‍जा केला आहे. रविवारी झालेल्‍या पुरूषांच्‍या दुहेरीतचेही सुवर्ण पदक त्‍यांनी पटकावले. चीनचा काई युन आणि फू हायफेंगच्‍या जोडीने डेन्‍मार्कच्‍या जोडीला हरवले. यापूर्वी चीनने महिला एकेरी, पुरूष एकेरी, मिश्र दुहेरी आणि महिला दुहेरीचा किताब पटकाविला होता.
मॅरेथॉनमध्‍ये विक्रम
इथिओपियाच्‍या टिकी जिलानाने महिलांच्‍या मॅरेथॉनमध्‍ये विक्रमी वेळ नोंदवून स्‍पर्धा जिंकली. जिलानाने दोन तास 23 मिनिट आणि सात सेकंद अशी ऑलिम्पिकमध्‍ये विक्रमी वेळ नोंदवली. केनियाच्‍या प्रिस्‍का जेप्‍टूने रौप्‍य पदक मिळवले. तर रशियाच्‍या तात्‍याना पेत्रोव्‍हा आर्शिपोव्‍हाने कांस्‍य पदक पटकावले.

मिस
पॉवेलचा खळबळजनक पराभव
युसेन बोल्‍टच्‍या 100 मीटरमधील विजयाचा जमैकामध्‍ये मोठा जल्‍लोष साजरा करण्‍यात येत आहे. विशेष म्‍हणजे, दुस-या क्रमांकावरही जमैकाचाच योहान ब्‍लॅक राहिला. मात्र जमैकाचा तिसरा खेळाडू असाफा पॉवेल मात्र खूप मागे राहिला. तो इतक्‍या मागे राहिला की त्‍याने स्‍पर्धाच सोडून दिली आणि सर्वात शेवटी आला.
एकेकाळी त्‍याला जगातील सर्वात वेगवान धावपटू मानले जात. मात्र बोल्‍ट आणि ब्‍लॅकसमोर पॉवेल आता खूपच मागे राहिला आहे, असे वाटते.
हॉकी संघाच्‍या पात्रतेवर प्रश्‍नचिन्‍ह
लंडन ऑलिम्पिकमध्‍ये गेलेला हॉकी संघ आता एक तर सामना जिंकू शकतो का नाही यावरच प्रश्‍न विचारले जात आहेत. आतपर्यंत संघाने चार सामने खेळले असून प्रत्‍येक सामन्‍यात ते तोंडावर आपटले आहेत.
रविवारी दक्षिण कोरियाबरोबर झालेल्‍या सामन्‍यात त्‍यांना 4-1 अशा मोठया फरकाने पराभव स्‍वीकारावा लागला. सेमी फायनलच्‍या स्‍पर्धेतून भारत केव्‍हाच बाहेर पडला आहे. येत्‍या मंगळवारी भारताचा बेल्जियमबरोबर शेवटचा सामना आहे. भारताला हॉलंडने 3-2 तर न्‍यूझीलंडने 3-1 ने पराभव केला होता. जर्मनीने तर 5-2 अशा फरकाने हरवले होते.
मायकेल नोब्‍जची हॉकी संघावर शेरेबाजी
भारतीय हॉकी संघाच्‍या दुर्दशेवर आता सर्वच स्‍तरातून टीका करण्‍यात येत आहे. संघाचे प्रशिक्षक मायकेल नोब्‍ज यांनी संघावर ऐक्‍याचा अभाव आणि नियोजनाप्रमाणे खेळत नसल्‍याचा आरोप केला आहे.
परंतु, असे म्‍हणून नोब्‍ज आपली जबाबदारी झटकू शकत नाहीत. कारण संघाच्‍या विजयास ते जसे कारणीभूत असतात त्‍याप्रमाणेच ते पराभवाबद्दलही जबाबदार आहेत.
मरेला झटका
अँडी मरेने पुरूष एकेरीत फेडररला पराभूत करून जरी विजय मिळवला असला तरी दुसरे सुवर्ण पदक पटकवण्‍याचे त्‍याचे स्‍वप्‍न साकार होऊ शकले नाही. मिश्र दुहेरीच्‍या फायनलमध्‍ये मरे आणि लॉरा रॉब्‍सन जोडीला बेलारूच्‍या मॅक्‍स मिनर्या आणि व्हिक्‍टोरिया अजारेन्‍का जोडीने पराभूत केले. त्‍यांना रौप्‍य पदकावरच समाधान मानावे लागले.
जोकोव्हिच्‍या नशिबात कांस्‍य पदकही नाही
जगातील दुस-या क्रमांकाचा खेळाडू सर्बियाचा नोव्‍हाक जोकोव्हिचला यंदाचे ऑलिम्पिक काही खास राहिले नाही. सेमी फायनलमध्‍ये अँडी मरेकडून पराभूत झाल्‍यानंतर त्‍याला कमीत कमी कांस्‍य पदकाची अपेक्षा होती. मात्र त्‍याच्‍या नशीबात तेही नव्‍हते. तिस-या स्‍थानी अर्जेंटीनाच्‍या युआन मार्टिन डेल पोत्रीने त्‍याला 7-5 आणि 6-4 अशा सरळ सेट्समध्‍ये पराभूत केले.
OLYMPIC : मायकेल फेल्प्सची कृतार्थ मनाने निवृत्ती
OLYMPIC : मायकल फेल्प्सची आई झाली भावुक
OLYMPIC : शेली ठरली वेगवान महिला
OLYMPIC : देशासाठी धावत नाही : रामसिंह
OLYMPIC : 101 वर्षांनंतर इंग्लंडला ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण
OLYMPIC: भूपतीची जिद्द भारताला पडली भारी