आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

OLYMPIC नववा दिवस: सेरेना नावाचे वादळ आणि कमनशिबी किम कॉलिन्‍स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- ऑलिम्पिकच्‍या नवव्‍या दिवशी अनेक खळबळजनक घटना घडल्‍या. सेरेनाने आपल्‍या लौकिकाप्रमाणे खेळ करीत मारिया शारापोव्‍हाला पराभूत करून महिला एकेरीचे सुवर्ण पदक पटकावले. तर दुसरीकडे फक्‍त आपल्‍या पत्‍नीला भेटावयास गेल्‍यामुळे सेंट किट्स च्‍या किम कॉलिन्‍सला संघातूनच बाहेर काढण्‍यात आले. चीनी खेळाडू शिन वॉंगच्‍या दुखापतीमुळे साईनाला कांस्‍य पदक मिळाले. 100 मीटरमध्‍ये जगातील वेगवान धावपटू युसेन बोल्‍टने जरी उपांत्‍य फेरीत जागा मिळवली असली तरी त्‍याचा प्रतिस्‍पर्धी योहान ब्‍लॅकने त्‍याच्‍यापेक्षा कमी वेळ नोंदवली. नवव्‍या दिवशी घडलेल्‍या अशाच काही उल्‍लेखनीय घटनांचा घेतलेला हा धावता आढावा...
हिट
सेरेना नावाचे वादळ
महिला टेनिसमधील झंझावात सेरेना विल्‍यम्‍सने ऑलिम्पिकमधील एकेरीतील सुवर्ण पदक आपल्‍या नावे केले आहे. तिने आपल्‍या लौकिकाप्रमाणे अंतिम सामन्‍यात खेळ केला. तिच्‍यासमोर रशियाच्‍या मारिया शारापोवाचे काहीच चालले नाही. पहिला सेट 6-0ने जिंकल्‍यानंतर सेरेनाने खेळात जी आघाडी घेतली ती दुस-या सेटमध्‍येही कायम ठेवली. तिने तो सेट 6-1 ने जिंकला.
'फुल'राणीचे कांस्‍य पदक
भारताची शटल स्‍टार साईना नेहवाल भारताला पदक मिळवून देणारी दुसरी महिला खेळाडू बनली आहे. तिने बॅडमिंटनच्‍या महिला एकेरी सामन्‍यात कांस्‍य पदक पटकावले.
विशेष म्‍हणजे साईनाने पहिला गेम गमावला होता. मात्र तिची प्रतिस्‍पर्धी चीनची शिन वॉंग जखमी झाल्‍यामुळे सामन्‍यातून माघार घेण्‍याचा निर्णय घेतला. यामुळेच साईनाला कांस्‍य पदक मिळाले. पण त्‍यामुळे साईनाच्‍या कामगिरीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. संपूर्ण ऑलिम्पिकमध्‍ये तिने ज्‍या पद्धतीने खेळ केला तो खरचं स्‍पृहणीय होता.
अँडी मरेकडून अपेक्षा
इंग्‍लंडचा अँडी मरे टेनिसमधील पुरूष एकेरीच्‍या अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्‍याचबरोबर तो मिश्र दुहेरीच्‍या अंतिम सामन्‍यातदेखील जागा मिळवली आहे. याचा अर्थ त्‍याने इग्‍लंडसाठी दोन पदके निश्चित केली आहेत.
अँडी मरे आणि लॉरा रॉबसन जोडी रविवारी मिश्र दुहेरीचा अंतिम सामना खेळणार आहे. त्‍याचबरोबर रविवारी अँडी मरे एकेरीत रॉजर फेडररशी भिडणार आहे.
बोल्‍ट नावाची नॉनस्‍टॉप एक्स्प्रेस
जगातील सर्वात वेगवान धावपटूमधील एक युसेन बोल्‍टने 100 मीटर स्‍पर्धेच्‍या उपांत्‍यफेरीमध्‍ये सहज प्रवेश मिळवला.
त्‍याने सुरूवात जरी हळू केली होती तरी तो लवकरच लयीत आला आणि आपला वेग वाढवला. त्‍याने 100 मीटर स्‍पर्धा 10.09 सेकंदात पूर्ण केली. मात्र त्‍याचा सहकारी आणि जागतिक चॅम्पियन योहान ब्‍लॅकने फक्‍त 10 सेकंदात ही शर्यत पूर्ण केली.
देवेंद्रो पोहोचला उपउपांत्‍यफेरीत
भारताचा बॉक्‍सर देवेंद्रोसिंगने मंगोलियाचा बॉक्‍सर सरडाम्‍बा पुरेवदोर्जला पराभूत करून उपउपांत्‍यफेरीत पोहोचला आहे. देवेंद्रोने 16-11ने विजय मिळवला. विशेष म्‍हणजे बीजिंग ऑलिम्पिकमध्‍ये रौप्‍य पदक मिळवणा-या बॉक्‍सरला देवेंद्रोने हरवले.
मणिपूरच्‍या देवेंद्रोने 49 किलाग्रॅम वजनी गटात दोन्‍ही सामन्‍यात जबरदस्‍त प्रदर्शन केले आहे. देवेंद्रोने पहिल्‍या सामन्‍यात पहिल्‍या फेरीतच प्रतिस्‍पर्धी खेळाडूला धूळ चारली होती.
मिस
जायबंदी वांगने सोडले मैदान
चीनची खेळाडू शिन वांग साईना नेहवालविरूद्धच्‍या सामन्‍यात कम‍नशिबी ठरली. सामन्‍यातील पहिला सेट झाल्‍यानंतर ती जखमी झाली.
पहिला सेटमध्‍ये काट्याची टक्‍कर झाली. मात्र शिनने साईनाला 21-18 ने पराभूत केले. दुस-या सेटमध्‍येही ती 1-0 ने आघाडीवर होती. मात्र दुखापतीमुळे तिला खेळणे कठीण जात होते. शेवटी त्‍याने सामना सोडण्‍याचा निर्णय घेतला आणि चौथ्‍या स्‍थानावर तिला समाधान मानावे लागले.
पेस आणि सानियाचा प्रवास संपुष्‍टात
भारताच्‍या लियांडर पेस आणि सानिया मिर्झा ही जोडी मिश्र दुहेरीतून बाहेर पडली आहे. उपउपांत्‍य सामन्‍यात त्‍यांना बेलारूसच्‍या मॅक्‍स मिनर्या आणि व्हिक्‍टोरिया अजारेन्‍का जोडीने सरळ सेट्समध्‍ये हरवले. शुक्रवारी अंधुक प्रकाशामुळे सामना पूर्ण होऊ शकला नव्‍हता.
पहिला सेट 7-5 ने गमावल्‍यानंतर सानिया जोडीने दुस-या सेटमध्‍ये पुनरागमन करण्‍याचा प्रयत्‍न केला आणि सामना ट्राय ब्रेकमध्‍ये गेला. मात्र टायब्रेकरमध्‍ये ते पराभूत झाले. त्‍याच्‍या पराभवामुळे भारतीय टेनिस संघाचा ऑलिम्पिकमधील प्रवास संपुष्‍टात आला आहे.
स्‍पर्धेदरम्‍यान पत्‍नीस भेटणे पडले महागात
सेंट किट्स अँड नेव्हिसचा धावपटू किम कॉलिन्‍सला आपल्‍या पत्‍नीजवळ जाणे महागात पडले आहे. त्‍यामुळे त्‍याला संघाबाहेर करण्‍यात आले आहे. पण यासाठी परवानगी घेतल्‍याचे कॉलिन्‍सचे म्‍हणणे आहे.
मात्र सेंट किट्स अँड नेव्हिसच्‍या अधिका-यांच्‍या मते त्‍याने तीन दिवसांपर्यंत काहीच सांगितले नव्‍हते. यावर कॉलिन्‍स म्‍हणतो, तुरूंगात राहणा-याला सुद्धा आपल्‍या पत्‍नीस भेटण्‍याची परवानगी दिली जाते.
इंग्‍लंडला धक्‍का
इंग्‍लंडच्‍या महिला हॉकी संघाला जबरदस्‍त झटका बसला आहे. चीनने त्‍यांना 2-1 ने पराभूत करून सर्वांना चकीत केले आहे. इंग्‍लंडनने आपले तिन्‍ही सामने जिंकले होते आणि हा सामना जिंकून उपांत्‍य फेरीत त्‍यांना स्‍थान मिळवायचे होते. मात्र असे काही झाले नाही. चीनकडून पराभूत झाल्‍यानंतर त्‍यांच्‍या पुढचा प्रवास कठीण झाला आहे.
OLYMPIC : लंडनमध्ये आणखी एका भारतीय मुष्टीयोद्धावर अन्याय ?
LONDON OLYMPIC : 9.58 सेकंद...की त्यापेक्षा कमी?
LONDON OLYMPIC : ‘फुल’राणीला कांस्यपदक !
OLYMPIC: सेंट्रल लंडन नव्हे, हे तर भुतांचे शहर!