आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

OLYMPIC सातवा दिवस: साईना 'शायनिंग' तर जयवर 'भगवान' नाराज !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- हिट...
साईनाचा सुपर विजय...
भारतासाठी साईनाने गुरूवारचा दिवस अविस्‍मरणीय ठरवला. क्‍वार्टर फायनलमध्‍ये विजय मिळवून सेमी फायनलमध्‍ये पोहोचणारी ती पहिलीच भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे. बीजिंग ऑलिम्पिकमध्‍ये तिचा प्रवास क्‍वार्टर फायनलपर्यंतच राहिला होता. मात्र लंडनमध्‍ये तिने संयम कायम ठेवून जबरदस्‍त विजय मिळवला.
विजेंद्र सिंगकडून अपेक्षा...
विजेंद्र जेव्‍हाही बॉक्सिंग रिंगमध्‍ये सामन्‍यासाठी उतरतो, तेव्‍हा त्‍याच्‍या नावाचा एकच जयघोष सुरू होतो. विजेंद्रने गुरूवारी 75 किलोग्रॅम वजनी गटात अमेरिकेच्‍या बॉक्‍सरला हरवले. देशाची आपल्‍याकडून भरपूर अपेक्षा असल्‍याचे विजेंद्र जाणून आहे. आतापर्यंत विजेंद्रने अपेक्षेनुसारच खेळ केला आहे.
'फ्लाईंग फिश' ची 20 पदके...
मायकेल फेल्‍प्‍सचा सध्‍या फॉर्म हरपला असला तरी त्‍याने आतापर्यंत आपल्‍या खात्‍यात आणखी एका सुवर्ण पदकाची भर घातली आहे. 200 मीअर वैयक्तिक मेडले स्‍पर्धेत फेल्‍प्‍सने सुवर्ण पदक पटकावले. अशा पद्धतीने त्‍याने आपल्‍या ऑलिम्पिक पदकाची संख्‍या 20 पर्यंत नेली आहे.
रेकॉर्ड ब्रेकर खेळाडू
अमेरिकेच्‍या रेबेका सोनीने महिलांच्‍या 200 मीटर ब्रेस्‍ट स्‍ट्रोक जलतरण स्‍पर्धेत आपलाच विश्‍वविक्रम मोडला आहे. हा विक्रम रेबेकाने आपल्‍या प्रशिक्षकांना समर्पित केला आहे. प्रशिक्षकांनी कायम प्रेरणा दिल्‍यामुळेच हे साध्‍य झाल्‍याचे तिने म्‍हटले. साटोमी सुझुकी हे रेबेका सोनीचे प्रशिक्षक होते.
दिग्‍गज महिला टेनिसच्‍या सेमीफायनलमध्‍ये
ऑलिम्पिकमध्‍ये महिला एकेरी टेनिसच्‍या सेमी फायनलमध्‍ये अमेरिकेच्‍या सेरेना व्हिल्‍यम्‍सचा सामना जगातील नंबर एकची खेळाडू केरोलाईना वोज्नियाकीशी होणार आहे. रशियाची मारिया शारापोव्‍हाही सेमी फायनलमध्‍ये पोहोचली आहे. तिने क्‍वार्टर फायनलमध्‍ये किम क्‍लाइसर्टसला पराभूत केले.
मिस...
रंजनकडून निराशा
ऑलिम्पिकमध्‍ये ज्‍या एका भारतीय नेमबाजाकडून पदकाची अपेक्षा केली होती. तो काल बाहेर पडला. रंजन सोढीने सुरूवात तर चांगली केली होती. मात्र अपेक्षेप्रमाणे त्‍याला खेळ उंचावता आला नाही. तो पदक पटकावेल म्‍हणून सामना पाहण्‍यासाठी भारतीय क्रीडा मंत्रालयातील अनेक अधिकारी आणि सर्मथकांनी गर्दी केली होती. परंतु, रंजनने निराशा केली. तिस-या फेरीत त्‍याने अनेक चुका केल्‍या. त्‍यामुळे त्‍याला फायनलमध्‍ये जाता आले नाही.
कश्‍यपने मने जिंकली...
भारतीय बॅडमिंटनपटू पी. कश्‍यपकडून कोणालाही विशेष अशा अपेक्षा नव्‍हत्‍या. मात्र त्‍याने ज्‍यापद्धतीने खेळ केला, तो सर्वांची मने जिंकणारा खेळ होता. त्‍याने पहिल्‍यांदाच क्‍वार्टर फायनलमध्‍ये जागा बनवली होती. मात्र जगातील अव्‍वल खेळाडूसमोर त्‍याचे काहीच चालू शकले नाही. आणि त्‍याला पराभव स्‍वीकारावा लागला.
ब्रिटनसाठी निराशजनक 'बीच व्‍हॉलीबॉल'...
यजमान ब्रिटनचा संघ बीच व्‍हॉलीबॉलच्‍या सेमी फायनलमधून बाहेर पडला आहे. झारा डॅम्‍पलिन आणि सारा मुलिनच्‍या जोडीने या सामन्‍यात चांगले प्रदर्शन करण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र त्‍यांना विजय मिळवता आला नाही. आणि स्‍पर्धेतून बाहेर जावे लागले.
जय भगवान
आपला पहिला सामना जिंकून अपेक्षा वाढवलेल्‍या जय भगवानला गुरूवारी प्रतिस्‍पर्ध्‍यावर मात मिळवता आली नाही. कझाकिस्‍तानचा बॉक्‍सर झैलावुभोवने जय भगवानवर मात केली.
पावसाचा परिणाम...
नेमबाजी स्‍पर्धेत गुरूवारी पावसाने गोंधळ केला. मात्र परिस्थिती हळूहळू पूर्वपदाव आली आणि सामने पुन्‍हा सुरू झाले. एकवेळ पाऊस थांबणार नाही असेच सर्वांना वाटत होते. पावसामुळे सामना पाहायला आलेले दर्शक स्‍टँड सोडून पळाले होते.
OLYMPIC प्रगतिपुस्तक : भारताला आतापर्यंत एकच कांस्य
OLYMPIC: आखाड्यात चक्‍क अश्रूंच्‍या धारा !
OLYMPIC सहावा दिवस: बॅडमिंटनचा नवा स्‍टार आणि रॉजर फेडररला \'दे धक्‍का\'
OLYMPIC पाचवा दिवस: देवेंद्रो सिंगचा दम तर भूपती-बोपण्‍णाची हार
OLYMPIC चौथा दिवस: सायनाची घौडदौड सुरूच तर सांगवान ठरला दुर्दैवी
OLYMPIC तिसरा दिवस: ज्‍वालाचा राग आणि सायनाचा विजय
OLYMPIC दिवस दुसराः सायना, विजेंद्र, जयभगवान जिंकले !