आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालंडन - भारताचा विजेंद्रसिंग ऑलिम्पिक बॉक्सिंगच्या उपांत्यपूर्व लढतीत पराभूत होऊन स्पध्रेबाहेर झाला आहे. बीजिंग ऑलिम्पिकचा कांस्यपदक विजेता विजेंद्रला मिडलवेट (75 किलो) गटात उज्बेकिस्तानच्या अब्बोस अतोवने 7-0 ने हरवले. या पराभवामुळे सलग दुसर्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे विजेंद्रचे स्वप्न भंगले.
बरोबरीत राहिला पहिला राउंड : भारताकडून पदकाचा प्रबळ दावेदार विजेंद्र आणि अतोव यांच्यात पहिला राउंड बरोबरीत सुटला. दोघांनी या फेरीत प्रत्येकी 3 गुण मिळवले.
दुसर्या राउंडमध्ये अतोव वरचढ : पहिला राउंड संपल्यानंतर दुसर्या फेरीत भारतीय खेळाडू आघाडी घेण्याची चाहत्यांना आशा होती. मात्र, याउलट घडले. या राउंडमध्ये अतोव वरचढ ठरला. अतोवने या फेरीत 7-5 चा स्कोअर करून 10-8 अशी आघाडी घेतली. विजेंद्रने अपर कटने उत्तर दिले. मात्र, अब्बोसला आघाडी घेण्यापासून तो रोखू शकला नाही.
पुनरागमन करू शकला नाही विजेंद्र : तिसर्या फेरीत विजेंद्रने आक्रमक होऊन काही पंच मारले. मात्र, अतोवने काऊंटर अटॅक करून गुण मिळवले. अब्बोसने तिसर्या फेरीतही 7-5 ने आघाडी घेतली. यासह त्याने आपले पदक निश्चित केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.