आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लंडन - डोमेनिक रिपब्लिकनच्या फेलेक्स सँचेझ याने 400 मीटर शर्यतीत 34 व्या वर्षी सुवर्णपदक पटकावले. अथेन्स ऑलिम्पिकमधील सुवर्णमयी कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास त्याला आठ वर्षे प्रतीक्षा करावी लागली.
तब्बल आठ वर्षांनंतर सुवर्णपदक पटकावत फेलेक्स सॅँचेझ याने या प्रकारातील वर्चस्व सिद्ध केले आहे. फेलिक्स याने वयाच्या 34 व्या वर्षी 47.63 अशी वेळ देऊन हे पदक जिंकले असून तीदेखील मोठी उपलब्धी आहे. याआधी त्याने अथेन्स ऑलिम्पिकमध्ये 2004 मध्ये डोमनिकन्स रिपब्लिकला पदक जिंकून दिले होते. मात्र 2008 मध्ये बीजिंग ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीच्या दिवशीच त्याच्या आजीचे निधन झाल्याचे समजल्यानंतर तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकला नव्हता. त्यामुळे यंदाचे ऑलिम्पिक हे फेलिक्सची अखेरची संधी होते. फेलीक्सने ही स्पर्धा जिंकल्यानंतर लगेचच त्याच्या पोटाजवळ ठेवलेले त्याच्या आजीचे छायाचित्र झळकवत हे पदक तिला अर्पण करीत असल्याचे सांगितले. तिनेच मला घडविल्याने हे पदक तिच्या नावे करीत असल्याचे फेलिक्सने नमूद केले.
Sponsored By
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.