आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लंडन - ऑलिम्पिक महिला थाळीफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताची थाळीफेकपटू कृष्णा पुनिया सातव्या स्थानी राहिली. पुनियाने 63.62 मीटर थाळीफेक केली. ती 64.76 मीटर या आपल्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीची बरोबरीही करू शकली नाही. कृष्णाला आधीपासूनच विजेतेपदाचे प्रबळ दावेदार समजले जात नव्हते.
शनिवारी रात्री झालेल्या लढतीत ती किमान आपली वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीची बरोबरी करेल, ही अपेक्षाही फोल ठरली. क्रोएशियाच्या सँड्रा पराकोविकने 69.11 मीटर थाळेफेक करत नव्या राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. रशियाच्या डार्या पिशचालनिकोव्हाने 67.56 मीटर थाळीफेक करत रौप्य तर, चीनच्या यांगफेंग लीने 67.22 मीटरसह कांस्यपदक जिंकले.
राष्ट्रकुलमधील पदक विजेती कृष्णाने पहिल्या प्रयत्नात 62.42 मीटर थाळीफेक केली. दुस-यात फाऊल तर तिस-यात 61.61 मीटर फेक केली. अंतिम फेरीत पोहोचलेल्या 12 पैकी चार खेळाडू तीनच प्रयत्नांनंतर स्पर्धेबाहेर झाल्या. या वेळी कृष्णा सातव्या स्थानी होती. चौथाही प्रयत्न फाऊल तर पाचव्यात तिने 53.62 मीटरची नोंद केली. शेवटच्या प्रयत्नात कृष्णा 61.31 मीटर लांबच थाळीफेक करू शकली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.