आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लंडन - ऑलिम्पिकच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी खेळाडू, अमेरिकेचा सुपरस्विमर मायकेल फेल्प्सने शनिवारी रात्री उशिरा जलतरण तलावात अखेरची उडी मारून सुवर्ण जिंकले. यासह त्याने 18 सुवर्णांसह एकूण 22 ऑलिम्पिक पदके जिंकत निवृत्ती घेतली.
27 वर्षीय फेल्प्सच्या नेतृत्वाखाली अमेरिकेने 4 गुणे 400 मीटर फ्रीस्टाइल रिले टीममध्ये ऑलिम्पिक जलतरणाच्या अखेरच्या दिवशी सुवर्ण जिंकले. स्पर्धेनंतर फेल्प्स अत्यंत भावुक झाला होता. ‘माझ्या कारकीर्दीचा शेवट यापेक्षा अधिक उत्तम असू शकत नाही. मला जे आवडत होते, मिळवायचे होते ते सर्व मी मिळवले आहे. मी खूप आनंदी आहे,’ असे या वेळी फेल्प्सने म्हटले.
अमेरिकेच्या या दिग्गज खेळाडूने अथेन्स ऑलिम्पिकमध्ये 6, बीजिंगमध्ये 8 आणि लंडनमध्ये 4 सुवर्ण जिंकून एकूण 18 सुवर्णपदके मिळवली. ही संख्या ऑलिम्पिकच्या इतिहासातील दुस-या क्रमांकाचा सर्वश्रेष्ठ अॅथेलिटच्या सुवर्णांपेक्षा दुप्पट आहे. इतकेच नव्हे तर फेल्प्सने आपल्या ऑलिम्पिक पदकांची संख्या 22 वर पोहोचवून सोव्हियतची जिम्नॅस्टिकपटू लारिसा लातिनिनाच्या 18 पदकांच्या विक्रमाला मागे टाकले.
लातिनिनाचा विक्रम जवळपास 50 वर्षांनंतर मोडला गेला. आता फेल्प्सचा विक्रम मोडण्यासाठी यापेक्षा अधिक कालावधी लागू शकतो. लंडनच्या अॅक्विटिक सेंटरवर फेल्प्सने आपली अखेरची रेस पूर्ण केल्यानंतर या महान खेळाडूच्या सन्मानार्थ स्टेडियममधील सर्व प्रेक्षक उभे झाले. या वेळी प्रेक्षकांत फेल्प्सची आईसुद्धा उपस्थित होती.
लाइफटाइम अचीव्हमेंट अवॉर्ड : जलतरणातील आंतरराष्ट्रीय संस्था फिनाने फेल्प्सला त्याच्या रेकॉर्डब्रेक कामगिरीमुळे लाइफटाइम अचीव्हमेंट पुरस्कार देऊन सन्मानित केले.
आय लव्ह यू म्हटले कोचने : अखेरपर्यंत फेल्प्सचे कोच असलेले बॉब बाऊमॅन यांनी हळूच आपल्या शिष्याच्या कानात ‘आय लव्ह यू’ असे म्हटले.
पुस्तकासाठी वाट बघा : माझ्या कारकीर्दीत अनेक चढउतार आले. मात्र, यानंतरही मी माझ्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरलो. आजपर्यंत जे कोणालाही जमले नाही ते मी करून दाखवले. लंडन ऑलिम्पिकच्या आठवणी अखेरपर्यंत माझ्यासोबत असतील. मी या अनुभवावर लवकरच एक पुस्तक लिहिणार आहे.
तिशीपर्यंत पोहायचे नव्हते - मी स्वत:शी एक निश्चय केला होता की, वयाच्या तिशीपर्यंत पोहायचे नाही. ज्या खेळाडूंनी वयाची 30 वर्षे ओलांडली आहेत त्या अॅथलिटच्या भावनेला मला दुखवायचे नव्हते. आता करिअरमध्ये आणखी काही नको, असे ज्या वेळी आपण म्हणतो त्या वेळी आपण दुसरीकडे लक्ष दिले पाहिजे. मी माझ्या कारकीर्दीला अवघ्या तीन शब्दांत संपवू इच्छितो...‘आय डिड इट’..!
जगभर हिंडणार - सिडनी ऑलिम्पिकपासून ते लंडन ऑलिम्पिकपर्यंत 12 वर्षे मी केवळ पोहण्यावर लक्ष केंद्रित केले. यादरम्यान अनेक देशांना भेटी दिल्या. मात्र, त्या देशाला मी नीटपणे बघू शकलो नाही. आता जगभर फिरण्याचा बेत आहे, असे फेल्प्सने म्हटले.
LONDON OLYMPIC : मायकल फेल्प्सची आई झाली भावुक
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.