आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

LONDON OLYMPIC : अभिनव बिंद्रा व विजेंद्र अपयशी, सुशीलकडून आशा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - चार वर्षांपूर्वी बीजिंग ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणार्‍या तीन भारतीय खेळाडूंमधील सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा व कांस्य विजेता विजेंदरचे ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले. आता पदकाची मदार बीजिंग ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सुशील कुमारवर आहे. गत ऑलिम्पिकमधील यशस्वी कामगिरीला उजाळा देण्याची त्याच्याकडून आशा आहे.
लंडन अँलिम्पिकमधील कुस्तीच्या फ्री स्टाइल सामन्याला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. या लढतीमध्ये भारताचे पाच मल्ल आपले आव्हान सादर करणार आहे. महाबली सतपाल यांचा शिष्य सुशीलकुमारकडून पदकाची सर्वात मोठी आशा आहे. तो स्पर्धेत 66 किलो वजन गटात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
सुशील कुमारने ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यामध्ये भारताच्या ध्वजधारकाची भूमिका बजावली होती. यामुळे आपल्यावर मोठी जबाबदारी पडली आहे, असे तो मानतो. त्यामुळे पदकासाठी मोठी मेहनत घेणार आहे, असेही त्याने सांगितले.
सुशील कुमारचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सतपाल हे छत्रसाल आखाड्याचे प्रशिक्षक रामफल यांच्यासह लंडनमध्ये दाखल झाले आहेत. गीता 9 ऑगस्टला आपला सामना खेळण्यासाठी मॅटवर उतरणार आहे, तर नरसिंग व अमित हे दोघे 10 ऑगस्टला आपला सामना खेळणार आहेत.
यांच्यावर असणार नजर
सतपाल यांचे शिष्य अमित कुमार (55 किलो) व योगेश्वर दत्त (60 किलो) हेदेखील पदकाच्या आशेचे किरण आहेत. महाराष्ट्राचा मल्ल नरसिंग यादवदेखील पदकासाठी सज्ज झाला आहे. विजयाची कुठलीही कसर सोडणार नसल्याचे त्याने सांगितले. महिलांत गीता फोगटकडून (55किलो) देशाला पदकाची खास आशा आहे.