आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LONDON OLYMPIC : देशासाठी धावत नाही : रामसिंह

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - भारताचा मॅरेथॉनपटू रामसिंग यादव याच्या लंडन ऑलिम्पिकमधील अधिकृत माहितीमध्ये असलेल्या एका विधानामुळे सध्या लंडमधील भारतीयांमध्ये खळबळ उडाली आहे. 120 कोटी लोकसंख्येच्या भारत देशाप्रमाणेच लंडनमधील भारतीयांची संख्यादेखील प्रचंड आहे. लंडनमध्ये सुमारे 10 ते 12 लाख भारतीय राहतात असे म्हणतात. भारतीय स्पर्धकांच्या निराशाजनक कामगिरीमुळे व्यथित झालेल्या लंडनवासीयांना रामसिंग यादवच्या विधानामुळे धक्काच बसला आहे. लंडन ऑलिम्पिक प्लेयर्स प्रोफाइलमध्ये रामसिंग यादवने म्हटले आहे, ‘मी देशासाठी पळत नाही. मी माझ्या संघासाठीही पळत नाही. मी माझ्या स्वत:साठीही धावत नाही. मी धावतोय फक्त माझ्या कुटुंबीयांसाठी. कारण मला त्यांचे पालनपोषण करायचे आहे.’
ऑलिम्पिकसाठी आलेल्या 10,500 खेळाडूंपैकी दारिद्र्यरेषेखाली जगणा-यांच्या देशातील खेळाडूही आले आहेत. त्यापैकी कुणीही असे विधान केलेले नाही. रामसिंग यादव लष्करात आहे. सरकारच्या कृपेनेच त्याचे प्रशिक्षण सुरू आहे, पगार मिळतो. त्याच्या या विधानामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
रामसिंग मूळचा वाराणसीचा. लष्करात भरती झाला. लष्कराने राबवलेल्या ‘गो फॉर गोल्ड’ या ऑलिम्पिक मोहिमेचा तो एक हिस्सा बनला. रामसिंग यादव गेली अनेक वर्षे म्हणून पुण्यातच असतो. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने काढलेल्या लंडन ऑलिम्पिक माहिती पुस्तिकेत पुण्याचे वास्तव्य दाखवण्यात रामसिंगला लाज वाटते. कोलकात्याच्या लिएंडर पेसने, बंगलोरच्या महेश भूपतीनेदेखील वास्तव्याचे स्थान मुंबई, महाराष्ट्र असे म्हटले आहे. पण रामसिंगला गेली कित्येक वर्षे पुण्यात राहूनही महाराष्ट्राचे नाव लावायला लाज वाटते. एक यादव (नरसिंग) स्वत:ला अस्सल मुंबईकर मानतो. मराठी-हिंदी शाळेत शिकतो. रामसिंग यादवच्या विधानाबाबत भारतीय ऑलिम्पिक महासंघाची भूमिका काय आहे?