आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mary Kom Will Face Toughest Competiton From Nicola Adams Toughest

मेरी कोमच्‍या सुवर्णपदकातील अडथळा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- मेरी कोमने सलग दोन सामने जिंकून लंडन ऑलिम्पिकमध्‍ये आपले पदक निश्चित केले आहे. मात्र बुधवारी बॉक्सिंग रिंगमध्‍ये तिच्‍यासमोर निकोला अ‍ॅडम्‍सचे कडवे आव्‍हान असणार आहे.
मेरी कोम मे मध्‍ये जागतिक विजेतेपदाच्‍या क्‍वार्टर फायनलमध्‍ये ब्रिटनच्‍या या बॉक्‍सरकडून पराभूत झाली होती. त्‍यामुळे मेरी कोमला आता पराभवाचा बदला चुकता करण्‍याची चांगली संधी प्राप्‍त झाली आहे. दोघांची क्षमता पाहता हा सामना कमालीचा रोमांचक होण्‍याची शक्‍यता आहे.
वयाच्‍या 13 व्‍या वर्षी पहिल्‍यांदा बॉक्सिंग रिंगमध्‍ये उतरणारी साडेपाच फूट उंचीच्‍या निकोलाचा सामना तिच्‍यापेक्षा उंचीने कमी असणा-या मेरी कोमशी होणार आहे. त्‍यामुळे मेरी कोमला आपल्‍या रणनीतीत बदल करावा लागणार आहे.
मेरी कोमने आपल्‍या मागील दोन्‍ही सामन्‍यात स्‍ट्रेट पंच मारून अनेक पॉईंट मिळवले होते. दोघीही 29 वर्षांच्‍या आहेत.
पाच वेळा विश्‍वविजेतेपद पटकावण्‍यासाठी तुमच्‍यात काहीतरी वेगळी प्रतिभा असली पाहिजे. पण माझी उंची माझ्यासाठी बेरजेची बाजू ठरणार आहे, असे जागतिक विजेतेपदात तीन वेळा रौप्‍य पदक मिळवणा-या निकोलाने म्‍हटले आहे.
निकोलाने बल्‍गेरियाच्‍या स्‍तोयका पेट्रोव्‍हाला 16-7 ने पराभूत करून सेमीफायनलमध्‍ये स्‍थान मिळवले आहे.
ऑलिम्पिकमध्‍ये महिला बॉक्सिंगचा पहिल्‍यांदाच समावेश करण्‍यात आला आहे. यामध्‍ये फक्‍त 51, 60 आणि 75 किलोग्रॅम वजनी गट पाडण्‍यात आले आहेत.
यापूर्वी मेरी कोमने 48 किलोग्रॅम वजनी गटात जागतिक जेतेपद मिळवले होते. त्‍यामुळे तिला ऑलिम्पिकमध्‍ये 51 किलोग्रॅम वजनी गटात यावे लागले आहे. तर निकोलाही 54 किलोग्रॅम गटातून खाली येऊन 51 किलो गटात उतरली आहे.
OLYMPIC 11 वा दिवस: ब्राझीलचा चीनला \'दे धक्‍का\' आणि भारताचा \'एम\' फॅक्‍टर
OLYMPIC: विजेंद्रचा पराभव, सायनाचे मायदेशात जंगी स्‍वागत
LONDON OLYMPIC : बोल्ट पृथ्वीवरचा वेगवान मानव
LONDON OLYMPIC : ‘छुपा रुस्तम’ संबोधल्याने विजय नाराज
LONDON OLYMPIC : ‘डोपिंगचा डाग पुसला गेला’
LONDON OLYMPIC : कुस्तीतील पहिले सुवर्ण इराणला
LONDON OLYMPIC : क्षमतेवरील प्रश्नचिन्ह योग्य क्षणी मिटवल्याचा आनंद : मुरे
LONDON OLYMPIC : चीनकडून पुन्हा अव्वल स्थान खेचण्यासाठी अमेरिकेची शर्थ
OLYMPIC: लंडन ऑलिम्पिकमधील \'एम\' फॅक्‍टर
OLYMPIC: तिकिटासाठी काहीही करणारा अवलिया