आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेरी कोमचे पदक निश्चित; मारोओला हरवित दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- भारताची सुपर मॉम मेरी कोमने लंडन ऑलिम्पिक बॉक्सिंग स्पर्धेतील आज उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात विजय मिळवत उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. महिला लाइटवेट (51 किलोग्रॅम) गटात मेरी कोमने ट्युनिशियाच्या रहाली मारोआला 15-6 फरकाने हरवले. यामुळे भारतासह मेरी कोमचे पदक आता निश्चित झाले आहे.
उपांत्यपूर्व फेरीत मेरी कोमचा मुकाबला ट्युनिशियाच्या रहाली मारोआविरुद्ध झाला. याआधी मारोआला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. लंडन ऑलिम्पिक बॉक्सिंगमध्ये उपांत्य फेरीत पोहोचणारी मेरी कोम तिसरी भारतीय बॉक्सर आहे. याआधी पुरुषांत विजेंद्र आणि देवेंद्रो यांनी अंतिम आठमध्ये प्रवेश केला आहे.
OLYMPIC: लंडन ऑलिम्पिकमधील 'एम' फॅक्‍टर