आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लंडन- ऑलिम्पिकमधील पदकाची प्रबळ दावेदार भारताची अव्वल 29 वर्षीय बॉक्सर मेरी कोम हिने 51 किलो वजनी गटात शानदार विजय मिळवला आहे. या लढतीत तिने पोलंडच्या कॅरोलिनाला मिशेलजुकला पराभूत केले. या विजयाबरोबरच तिने क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
आक्रमक मेरी कोमने कॅरोलिनाला 19-14 अशा फरकाने पराभूत केले. आता तिची लढत टयुनिशियाची बॉक्सर मरोआ रहालीशी सोमवारी होणार आहे.
' ही चांगली सुरूवात आहे, भारतातल्या सर्वधर्मातील लोकांनी माझ्या विजयासाठी प्रार्थना केल्यानेच मला यश मिळाले.पहिला अडथळा पार केल्याने मी फार आनंदी आहे' असे विजयानंतर मेरी कोमने म्हटले.
गेल्या दोन दिवसांपासून भारतीय बॉक्सरशी निगडीत वाईट बातम्यांमुळे भारतीय दलात नैराश्याचे वातवारण पसरले होते. मात्र मेरीकोमने सहजपणे मिळवलेल्या विजयामुळे भारताच्या पदकाच्या आशा पुन्हा जिवंत झाल्या आहेत. मेरी कोमने यापूर्वी बॉक्सिंगमधील जगजेतेपद मिळवले आहे. 51 किलो वजनी गटात ती प्रथमच खेळत आहे.
भारताकडून खेळताना दु:ख होते -मेरी कोम
OLYMPIC: चिनी खेळाडूंची दहशत कमी होईल - साईना
OLYMPIC नववा दिवस: सेरेना नावाचे वादळ आणि कमनशिबी किम कॉलिन्स
OLYMPIC : लंडनमध्ये आणखी एका भारतीय मुष्टीयोद्धावर अन्याय ?
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.