आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Michael Phelps' Mother Had A Different Celebration For Her Son's Final Win

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

LONDON OLYMPIC : मायकल फेल्प्सची आई झाली भावुक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - वैयक्तिक अठरावे सुवर्ण आणि एकूण पदकसंख्या 22 वर पोहोचवून मायकलने त्याचे नाव ऑलिम्पिकविश्वात अजरामर केले आहे. दोन दशकांपेक्षा अधिक पदके मिळविणारा फेल्प्स हा जगातील एकमेव खेळाडू बनला असून त्याने खेळातून निवृत्ती पत्करल्याचे जाहीर करताच त्याची आई डेबी फेल्प्स या भावुक झाल्या होत्या.
त्याच्यामुळे मीदेखील इतकी फेमस झाले आहे की मलादेखील संपूर्ण अमेरिकेत कुठेही गेले तरी मायकलची मॉम म्हणून ओळखायला लागले असल्याचे डेबी यांनी सांगितले. अगदी विमानतळावर, रेल्वेस्टेशनवरही लहान बालकेदेखील माझ्याकडे बघून हात हलवू लागले आहेत. त्याच्या संपूर्ण करिअरमध्ये अनेकांनी त्याला मदत आणि मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे तो निवृत्त झाल्यावर काय करेल, त्याबाबत मला चिंता नाही. तो सर्वप्रथम स्वत:साठी वेळ काढणार असून त्यानंतर कुटुंबीयांनादेखील वेळ देईल. इतकी वर्षे जलतरणासाठी अत्यंत कठोर मेहनत त्याने केलेली आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर त्याने स्वत:साठी काही वेळ देणे साहजिकच असल्याचेही डेबी यांनी नमूद केले.
यंदा भरपूर बर्फ पडेल आणि त्या बर्फानंतर आम्ही घरातील शेकोटीसमोर आम्ही सर्वजण जमा होऊन त्याच्याच तोंडून त्याच्या विजयाच्या कहाण्या ऐकणार असल्याचे डेबी फेल्प्स यांनी नमूद केले. डेबी यांनी त्यांच्या मुलाबरोबर खाद्यपदार्थ आणि वस्त्रप्रावरणांच्या जाहिरातीत काम केले. तर मायकलची बहीण हिलरीने स्वत:ची वेबसाइट सुरू केली आहे.
लोशेची आई म्हणते, मलाही वाईट वाटले अमेरिकेचा दुसरा स्टार जलतरणपटू रेयान लोशेची मॉम असलेल्या आइक लोशे यांनी मात्र मी कॅमे-यासमोर नर्व्हस होते. त्यामुळे जाहिरातींमध्ये काम करायला आवडत नसल्याचे सांगितले. दोघांच्या स्पर्धांचे सामने आम्ही उत्सुकतेने बघत असलो तरी मनात आपलाच मुलगा जिंकावा ही भावना अर्थातच असते. मात्र मायकलच्या निवृत्तीने मलाही वाईट वाटल्याचे आइक लोशेने नमूद केले.